ऑटोमोबाईल

होंडाच्या ‘या’ बाईकची एकदा टाकी फुल करा आणि 500 ते 700 किमी पर्यंत पळवा! 5 हजार डाऊन पेमेंट भरल्यावर किती मिळेल लोन व किती लागेल ईएमआय?

Published by
Ajay Patil

Honda SP 125 Bike:- बाईक घेताना प्रामुख्याने दोन गोष्टींचा विचार प्रत्येक जण करत असतो. त्यातील पहिला म्हणजे आपला बाईक घेण्याच्या बाबतीत असलेला आर्थिक बजेट आणि दुसरे म्हणजे आपण जी काही बाईक घेणार आहोत त्या बाईक कडून मिळणारे मायलेज या दोन गोष्टींना खूप महत्त्व दिले जाते.

मायलेजच्या बाबतीत बघितले तर याचा थेट परिणाम हा आपल्या खिशावर होत असल्यामुळे पैशांच्या बचतीच्या दृष्टिकोनातून गाडीचे मायलेज उत्तम असणे खूप गरजेचे असते. मायलेजचे बाबतीत बघितले तर भारतीय बाईक बाजारपेठेमध्ये होंडा आणि हिरो आणि त्यासोबत बजाज या कंपन्यांच्या बाईक सर्वात प्रसिद्ध आणि ग्राहकांमध्ये लोकप्रिय असलेले आहेत.

यासोबतच टीव्हीएस सारख्या कंपन्यांच्या बाईक देखील तितक्याच लोकप्रिय आहेत. परंतु होंडाच्या बाबतीत बघितले तर होंडाची एक बाईक मायलेजच्या बाबतीत सगळ्या बाईक्स पेक्षा उत्तम असून तिची जर एकदा टाकी फुल केली तर ती कमीत कमी पाचशे ते सातशे किलोमीटर पर्यंत अंतर पार करू शकते.

होंडाची ही सगळे मायलेज देणारी बाईक म्हणजे होंडा एसपी 125 ही होय. ही बाईक जर तुम्हाला फायनान्स वर खरेदी करायची असेल म्हणजे लोन घेऊन खरेदी करायचे असेल तर किती ईएमआय भरावा लागेल? याबाबतची माहिती आपण बघू.

किती आहे होंडा एसपी 125 ची किंमत?
होंडा कंपनीचे ही बाईक सध्या दोन व्हेरियंटमध्ये उपलब्ध असून एक ड्रम आणि दुसरा डिस्क ब्रेक व्हर्जनमध्ये येते. यामध्ये ड्रम व्हेरिएंटाची जर किंमत बघितली तर ती 87 हजार 468 रुपये एक्स शोरूम इतकी आहे तर डिस्क व्हेरिएंटची किंमत ही 91468 रुपये एक्स शोरूम इतकी आहे.

समजा तुम्हाला डिस्क व्हेरीयंट असलेली म्हणजेच ज्या व्हेरियंटची किंमत 91 हजार 468 रुपये असलेली बाईक खरेदी करायची असेल व ही बाईक जर तुम्हाला पाच हजार रुपये डाऊन पेमेंट वर मिळाली तर त्याची ऑन रोड किंमत साधारणपणे एक लाख एक हजार 768 रुपये इतकी आहे.

पाच हजाराचे डाऊन पेमेंट केले तर किती लोन मिळेल?
होंडा एसपी 125 या बाईकची ऑन रोड किंमत दिल्लीसाठी असून ती एक लाख 1 लाख एक हजार 768 रुपये असेल आणि या बाईक साठी जर तुम्ही पाच हजार रुपये डाऊन पेमेंट केले तर 96 हजार 768 रुपये तुम्हाला वित्तीय संस्था किंवा फायनान्स कंपनी कर्ज म्हणून देईल.

हे कर्ज जर तुम्ही पाच वर्षासाठी घेतले तर होंडाच्या अधिकृत वेबसाईटवर असलेल्या ईएमआय कॅल्क्युलेटर नुसार बघितले तर घेतलेल्या कर्जावर जर तुम्हाला दहा टक्के व्याजदर असेल आणि तुम्ही 96 हजार 768 रुपये कर्ज घेतले तर तुम्हाला महिन्याला 2056 रुपये ईएमआय भरावा लागेल.

पाच वर्षानंतर एकूण व्याजापोटी तुम्हाला 26594 रुपये व्याज द्यावे लागेल. तुम्हाला जर या बाईकवर फायनान्स करायचा असेल तर तुम्ही फायनस कंपन्यांशी संपर्क साधू शकता व या फायनान्स कंपन्या त्यांच्या अटी व शर्तीच्या आधारे पाच हजार रुपये डाऊनपेमेंट आणि ईएमआय सारख्या ऑफरच्या माध्यमातून तुम्हाला फायनान्स करू शकता.

65 किलोमीटरचे देते मायलेज
होंडा एसपी १२५ या बाईकमध्ये 123.94 सीसीचे इंजिन असून पाच स्पीड गियर बॉक्स आहे. पेट्रोल टाकीची क्षमता बघितली तर ती 11.2 लिटर असून ही बाईक 65 किलोमीटर पर्यंत मायलेज देते. या हिशोबाने जर बघितले तर या बाईकची एकदा जर टाकी फुल केली तर कमीत कमी 720 किलोमीटरचे अंतर कापू शकते.

Ajay Patil