ऑटोमोबाईल

Force Sanmaan 5000 Tractor: शेतीतील अवघड कामे बनवील सोपे हा 50 एचपीचा शक्तिशाली ट्रॅक्टर! वाचा किंमत आणि वैशिष्ट्ये

Published by
Ajay Patil

Force Sanmaan 5000 Tractor:- शेतकरी बंधू जेव्हा ट्रॅक्टर खरेदी करण्याचा विचार करतात तेव्हा साहजिकच त्यांच्या मनामध्ये असते की शेतीमधील अवघड कामे अगदी सोप्या पद्धतीने करता येतील व त्यामुळे पावरफुल व शक्तिशाली इंजिन असलेल्या ट्रॅक्टर घ्यावा व अशा ट्रॅक्टरच्या शोधामध्ये शेतकरी बंधू असतात.

तसे पाहायला गेले तर भारतामध्ये अनेक ट्रॅक्टर निर्माता कंपनी असून प्रत्येक कंपनीचे असे पावरफूल ट्रॅक्टर आहेत.

परंतु यामधून निवड करताना शेतकऱ्यांचा मात्र गोंधळ उडताना दिसतो. याच अनुषंगाने आपण या लेखामध्ये फोर्स कंपनीच्या एका ट्रॅक्टर बद्दल माहिती जाणून घेणार आहोत जे  शेतीसाठी तुम्ही शोधत असलेल्या शक्तिशाली ट्रॅक्टर करिता खूप योग्य पर्याय ठरेल. या ट्रॅक्टरचे नाव आहे ‘फोर्स सन्मान 5000’ हे होय. या ट्रॅक्टरची माहिती आपण या लेखात घेणार आहोत.

 ‘फोर्स सन्मान 5000’ ट्रॅक्टरची वैशिष्ट्ये

 फोर्स सन्मान 5000 ट्रॅक्टरमध्ये चार स्ट्रोक आणि तीन सिलेंडरमध्ये इंटर कुलर इंजिन सह इनलाईन डायरेक्ट इंजेक्शन टर्बो चार्जर, 45 एचपी पावर निर्माण करणारे पाहिला मिळते. या ट्रॅक्टरमध्ये ड्राय टाइप एअर फिल्टर देण्यात आलेला आहे.

फोर्स सन्मान 5000 ट्रॅक्टरची कमाल पिटीओ पावर 38.7 एचपी आहे आणि त्याचे इंजिन 2200 आरपीएम जनरेट करते. कंपनीचा हा ट्रॅक्टर 54 लिटर क्षमतेच्या इंधन टाकीसह येतो व या ट्रॅक्टरच्या हायड्रोलिक पावर १४५० किलो इतकी ठेवण्यात आलेली असून या ट्रॅक्टरचे एकूण वजन १९९५ किलोग्राम इतकी आहे. कंपनीचा हा ट्रॅक्टर बॉश कंट्रोल वोल्व,

CAT-II 3 पॉईंट लिंकेजसह ADCC सिस्टमसह येतो. या ट्रॅक्टरचा व्हिलबेस 2032 mm आणि ग्राउंड क्लिअरन्स 405 एमएम इतका आहे. तसेच या ट्रॅक्टरमध्ये पावर स्टेरिंग देण्यात आलेले असून शेतातील कामांसाठी याचा खूप मोठा फायदा होतो. हा ट्रॅक्टर आठ फॉरवर्ड+ चार रिव्हर्स गिअरसह गिअरबॉक्ससह येतो. कंपनीच्या या ट्रॅक्टरला ड्युअल,

ड्राय मेकॅनिकल ऍक्टिव्हेशन क्लच देण्यात आले असून हा शक्तिशाली ट्रॅक्टर सिंक्रोमेश प्रकारच्या ट्रान्समिशनसह येतो. या ट्रॅक्टरमध्ये फुली ऑइल एमर्स मल्टी प्लेट सील केलेले डिस्क ब्रेक देण्यात आलेले आहेत. हे ट्रॅक्टर दोन व्हील ड्राईव्हमध्ये येते.

 ‘फोर्स सन्मान 5000’ ट्रॅक्टरची किंमत

 फोर्स कंपनीने भारतात आपल्या या फोर्स सन्मान 5000 ट्रॅक्टरची एक्स शोरूम किंमत सात लाख 16 हजार ते सात लाख 43 हजार रुपये इतकी ठेवली आहे.

आरटीओ नोंदणी आणि सर्व राज्यांमध्ये जे काही रोड टॅक्स लागू आहेत त्यामुळे या ट्रॅक्टरची ऑन रोड किंमत बदलू शकते. तसेच फोर्स कंपनी त्यांच्या या फोर्स सन्मान 5000 ट्रॅक्टरसह तीन वर्षांची वॉरंटी देते.

Ajay Patil