वाहन बाजारपेठेचा जर आपण सध्याचा ट्रेंड पाहिला तर तो पेट्रोल आणि डिझेल कारच्या तुलनेमध्ये सीएनजी किंवा इलेक्ट्रिक कार उत्पादनाच्या बाबतीत जास्त दिसून येत आहे. कारण गेल्या कित्येक वर्षापासून पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीमध्ये प्रचंड प्रमाणात वाढ झाल्याने पेट्रोल व डिझेलवर चालणाऱ्या वाहनांचा वापर हा आर्थिक दृष्ट्या परवडणारा नसून अनेकजण आता त्यामुळे सीएनजी या पर्यायाकडे वळताना आपल्याला दिसून येत आहे.
याच माध्यमातून आता सीएनजी कार उत्पादनाकडे अनेक महत्त्वाच्या कार उत्पादक कंपन्यांनी देखील मोर्चा वळवल्याचे चित्र आहे. ग्राहकांची मागणी लक्षात घेऊन आता अनेक कंपन्या देखील आकर्षक वैशिष्ट्य असलेल्या व ग्राहकांना परवडतील अशा किमतींमध्ये अनेक सीएनजी कार देखील लॉन्च करत आहेत.
अशाप्रकारे कार उत्पादक कंपन्यांमध्ये प्रसिद्ध असलेल्या मारुती सुझुकीने देखील सगळ्यांची आवडती असलेली स्विफ्ट ही कार सीएनजी व्हेरियंटमध्ये लॉन्च केलेली असून तिला स्विफ्ट एस सीएनजी असे नाव देण्यात आलेले आहे. विशेष म्हणजे ही कार मारुती सुझुकीने तीन व्हेरीएंट्समध्ये ग्राहकांसाठी उपलब्ध केलेली आहे.
काय आहेत या सीएनजी स्विफ्टमध्ये देण्यात आलेली वैशिष्ट्ये?
स्विफ्टवरील पावर प्लांट ही 1.2 एल झेड सिरीज मोटर आहे जी सीएनजी मोडमध्ये 69.75 एचपीचे पिक पावर आउटपुट आणि 101.8 एनएम कमाल टॉर्क जनरेट करते. ही मोटर पाच स्पीड एमटीशी जोडलेली असून पेट्रोलच्या guise, 81.6 एचपी पिक पावर आणि 112 एनएम कमाल टॉर्क विकसित करते.
या मारुती सुझुकीच्या स्विफ्ट एस सीएनजीमध्ये सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून सहा एअर बॅग, इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी प्रोग्राम प्लस, हिल होल्ड असिस्ट इत्यादी फीचर्स देण्यात आलेले आहेत.
तसेच ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल, रियर एसी व्हेंट, वायरलेस चार्जर,60.40 स्प्लिट मागील सीट, सात इंचाची स्मार्ट प्ले प्रो इम्पोर्टेन्ट सिस्टम इत्यादी फीचर्स देण्यात आलेले आहेत.
किती आहे मारुती सुझुकी स्विफ्ट एस सीएनजीचे मायलेज?
मारुती सुझुकी स्विफ्ट एस सीएनजीसाठी 31.85 किमी/ प्रतिकिलो मायलेजचा दावा करत असून सध्याचे जर आपण दिल्लीतील सीएनजीची किंमत पाहिली तर ते 76.59 रुपये प्रति किलो आहे व यानुसार ही स्विफ्ट एक किलोमीटर धावण्यासाठी आपल्याला रनिंग कॉस्ट 2.33 रुपये इतकी येते.
मारुती सुझुकी स्विफ्ट एस सीएनजीची व्हेरियंटानुसार किंमत
मारुती सुझुकी स्विफ्ट सीएनजी ही तीन वेरियंट्स मध्ये ग्राहकांना उपलब्ध होणार आहे व त्या तीन वेरीएंट्सनुसार या कारची किंमत देखील वेगवेगळी आहे.
1- मारुती सुझुकी स्विफ्ट सीएनजी व्हीएक्सआय– या व्हेरियंटची किंमत आठ लाख 19 हजार 500 रुपये इतके आहे.
2- मारुती सुझुकी स्विफ्ट सीएनजी व्हीएक्सआय प्लस(VXI+)- या व्हेरियंटची किंमत आठ लाख 46 हजार पाचशे रुपये इतकी आहे.
3- मारुती सुझुकी स्विफ्ट सीएनजी झेडएक्सआय– या वेरियंटची किंमत नऊ लाख एकोणवीस हजार पाचशे रुपये इतकी आहे.
( या सर्व किमती एक्स शोरूम आहेत हे लक्षात घ्यावे.)