Car Discount Offer:- भारतामध्ये अनेक प्रसिद्ध कार निर्मिती करणाऱ्या कंपन्या आहेत व त्यामध्ये जर आपण एक प्रसिद्ध आणि सगळ्यांच्या तोंडी असलेले नाव पाहिले तर ते मारुती सुझुकीचे येते. गेल्या कित्येक वर्षापासून मारुती सुझुकी ही ग्राहकांच्या सेवेसी असून आजपर्यंत संपूर्ण देशामध्ये मारुतीच्या अनेक कार खूप प्रसिद्ध झालेले आहेत.
ग्राहकांची ओळख आणि आर्थिक क्षमता ओळखून कारची निर्मिती हे मारुती सुझुकी या कंपनीचे प्रमुख वैशिष्ट्ये सांगता येईल. अगदी त्यांच्या या प्रसिद्धी आणि ग्राहकाभिमुख धोरणाच्या पार्श्वभूमीवर विचार केला तर सध्या मारुती सुझुकी कंपनीच्या माध्यमातून फेब्रुवारी महिन्यामध्ये काही कारवर बंपर डिस्काउंट ऑफर दिली जात आहे.
तुम्हाला देखील जर मारुतीची कार विकत घ्यायची असेल तर तुमच्यासाठी ही एक सुवर्णसंधी आहे. डिस्काउंट ऑफरमध्ये तुम्हाला कॅशबॅक तसेच कॉर्पोरेट बोनस आणि एक्सचेंज ऑफरचा देखील फायदा मिळणार आहे.
मारुती सुझुकी देत आहे या कारवर बंपर डिस्काउंट
1- मारुती सुझुकी एस-प्रेसो- मारुती सुझुकीच्या एस प्रेसो एएमटी एडिशनवर फेब्रुवारी 2024 मध्ये 61 हजार रुपयांचे फायदे ऑफर केले जात असून यामध्ये चाळीस हजार रुपयांची रोख सवलत, पंधरा हजार रुपयांचा एक्सचेंज बोनस आणि 6000 रुपयांची कार्पोरेट सुट असे मिळून 56 हजार रुपयांचा फायदा मॅन्युअल वेरिएंट वर दिला जात आहे.
2- मारुती सुझुकी सेलेरिओ- मारुती सुझुकीच्या सेलेरिओ कारवर देखील ६१ हजार रुपयांचे फायदे दिले जात असून यामध्ये चाळीस हजार रुपयांची रोख सुट,
पंधरा हजार रुपयांचा एक्सचेंज बोनस आणि सहा हजार रुपयांची कार्पोरेट सूट दिली जाणार आहे. एवढेच नाही तर मारुती सुझुकी सेलेरिओ सीएनजी वर देखील 36 हजार रुपयांपर्यंतचा फायदा देण्यात येणार आहे.
3- मारुती सुझुकी अल्टो के10- मारुती सुझुकीच्या अल्टो 10 पेट्रोल व्हेरियंटवर 62 हजार रुपये पर्यंत फायदा उपलब्ध करून देण्यात आलेला आहे व यामध्ये चाळीस हजार रुपयांची रोख सवलत,
पंधरा हजार रुपयांचा एक्सचेंज बोनस आणि सात हजार रुपयांपर्यंत कार्पोरेट सुट समाविष्ट करण्यात आलेली आहे. तसेच सीएनजी मॉडेल्स वर 39 हजार रुपयापर्यंतचे बेनिफिट देखील दिले जाणार आहेत.
4- मारुती सुझुकी स्विफ्ट- सध्या मारुती सुझुकी स्विफ्टवर देखील 42 हजार रुपये किमतीचे फायदे उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत व यामध्ये पंधरा हजार रुपयांपर्यंत रोख सवलत, वीस हजार एक्सचेंज बोनस आणि सात हजार रुपयांची कार्पोरेट सुटीचा समावेश आहे.
5- मारुती सुझुकी डिझायर- मारुती सुझुकीच्या सध्याच्या मॉडेलवर 37 हजार रुपयापर्यंत फायदे मिळण्याची शक्यता असून यामध्ये पंधरा हजार रुपयांची रोख सवलत, पंधरा हजार रुपयांचा एक्सचेंज बोनस आणि सात हजार रुपयांचे कॉर्पोरेट फायदे यांचा समावेश आहे.