Best Mileage Bike:- सणासुदीचा कालावधी असल्यामुळे आता बऱ्याच जणांना नवीन बाईक्स घ्यायची इच्छा असेल किंवा एखाद्या सणाच्या शुभमुहूर्ताच्या पार्श्वभूमीवर बाईक खरेदी करावी असे वाटत असेल तर आता बाजारामध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारच्या बाईक उपलब्ध आहेत.
जेव्हा कोणतीही व्यक्ती बाईक खरेदी करायचा विचार करते तेव्हा कमीत कमी किमतीत आपल्याला चांगली वैशिष्ट्ये आणि उत्तम मायलेज देणारी बाईक मिळेल या दृष्टिकोनातून विचार करत असतो. भारतीय बाईक बाजारपेठेमध्ये कमी किमतीमध्ये खूप चांगले पर्याय उपलब्ध झाले असल्यामुळे ग्राहकांना देखील आता आवडीची बाईक खरेदी करणे सोपे झाले आहे.
त्यामुळे तुम्हाला देखील या सणासुदीच्या कालावधीत कमी किमतीत उत्तम मायलेज देऊ शकेल अशी बाईक खरेदी करायची असेल तर या लेखामध्ये दिलेली माहिती तुम्हाला फायद्याची ठरेल.
या आहेत कमी किमतीत उत्तम मायलेज देणाऱ्या बाईक
1- हिरो एचएफ 100- हिरो मोटोकॉर्प ही कंपनी भारतातील अग्रगण्य अशी बाईक उत्पादक कंपनी असून या कंपनीने ग्राहकांच्या गरजा लक्षात घेऊन आतापर्यंत अनेक वेगवेगळे वैशिष्ट्य असलेल्या बाईक लॉन्च केलेले आहेत. यामध्ये जर हिरो मोटोकॉर्पची एचएफ 100 ही बाईक पाहिली तर ही सर्वाधिक विक्री होणारी बाईक आहे.
या बाईकमध्ये कंपनीने 100cc इंजिन दिले असून ते 8.02 पीएस पावर जनरेट करते. यामध्ये चार स्पीड गिअरबॉक्स असून एका लिटर पेट्रोलमध्ये 70 किलोमीटरचे मायलेज देते. या बाईकचे सस्पेन्शन देखील उत्तम असून सीट देखील आरामदायी असून लांबच्या प्रवासासाठी ही बाईक उत्तम आहे. या बाईकची किंमत 53 हजार 318 रुपये आहे.
2- टीव्हीएस स्पोर्ट– टीव्हीएस कंपनीची ही बाईक एन्ट्री लेवल बाईक सेगमेंट मधील स्टायलिश बाईक म्हणून ओळखली जाते. या बाईकमध्ये 110cc चे इंजिन असून ते 8.29 पीएस पावर आणि जवळपास 8.7nm चा टॉर्क जनरेट करते.
या बाईक मध्ये चार स्पीड गिअर बॉक्स देण्यात आलेला असून यामध्ये ET-Fi टेक्नॉलॉजी चा वापर करण्यात आला आहे व त्यामुळे इंधनाचा वापर कमी होतो. ही बाईक 70 किलोमीटरचे मायलेज देते. या बाईकमध्ये दहा लिटरची इंधन टाकी असून ड्रम ब्रेक देण्यात आलेले आहेत व या बाईकची एक्स शोरूम किंमत साधारणपणे 59 हजार 881 रुपये आहे.
3- होंडा शाईन 100- ही बाईक देखील एक स्टायलिश बाईक असून यामध्ये 98.98 सीसी इंजिन देण्यात आलेले आहे. हे 5.43 kW जी पावर आणि 8.05m चा टॉर्क जनरेट करते.
तसेच हे इंजिन 4 स्पीड गिअरबॉक्सने सुसज्ज असून एका लिटर मध्ये 65 किलोमीटरचे मायलेज देते. या बाईकच्या फ्रंट आणि रियरमध्ये ड्रम ब्रेक्स देण्यात आलेले असून या बाईकची किंमत 65 हजार रुपये आहे. तसेच सीट लांब आणि मऊ असल्याने खराब रस्त्यावर देखील तुम्ही सहजपणे प्रवास करू शकतात. दररोजच्या वापरा करीता ही एक उत्तम बाईक आहे.