ऑटोमोबाईल

गुड न्यूज ! 28 किलोमीटरचं मायलेज देणाऱ्या ‘या’ टाटाच्या लोकप्रिय कारवर मिळतोय 60 हजार रुपयांचा डिस्काउंट, वाचा सविस्तर

Published by
Ahmednagarlive24 Office

Tata Car Discount Offer : आज अक्षय तृतीयाचा मोठा सण आहे. आज अनेकजण नवीन वाहन खरेदी करणार आहेत. तर अनेकांनी नवीन वाहन खरेदी देखील केले असेल. दरम्यान, नवीन कार खरेदी करू इच्छिणाऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे.

ज्या लोकांना येत्या काही दिवसात Tata कंपनीची नवीन कार खरेदी करायची असेल त्यांच्यासाठी एक मोठी गुड न्यूज समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार टाटा कंपनीने आपल्या एका लोकप्रिय कारवर मोठी डिस्काउंट ऑफर सुरू केली आहे.

टाटा कंपनी आपल्या लोकप्रिय टियागो या कारवर तब्बल 60,000 रुपयांचा डिस्काउंट ऑफर करत आहे. त्यामुळे जर तुम्हालाही ही गाडी खरेदी करायची असेल तर या ऑफरचा तुम्ही नक्कीच लाभ घेतला पाहिजे. मात्र ही ऑफर फक्त या चालू महिन्यातच राहणार आहे. मे 2024 पर्यंतच ही ऑफर मर्यादित राहणार आहे. दरम्यान आता आपण टाटा कंपनीच्या या ऑफरची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.

कशी आहे ही डिस्काउंट ऑफर

कंपनीने सांगितल्याप्रमाणे, Tata Tiago पेट्रोलच्या XT (O), XT आणि XZ+ वॅरीयंटवर एकूण 60,000 रुपयांची डिस्काउंट ऑफर करत आहे. या ऑफरमध्ये 45,000 रुपयांची रोख सवलत, 10,000 रुपयांचा एक्सचेंज बोनस आणि 5,000 रुपयांची कॉर्पोरेट सूट समाविष्ट आहे.

तसेच कंपनी Tata Tiago पेट्रोलच्या उर्वरित व्हेरियंटवर 50,000 रुपयांची सूट देत आहे. या ऑफरमध्ये 35,000 रुपयांची रोख सूट, 10,000 रुपयांचा एक्सचेंज बोनस आणि 5,000 रुपयांचा कॉर्पोरेट डिस्काउंट समाविष्ट आहे. तसेचं, कंपनी Tata Tiago च्या CNG व्हेरियंटवर 40,000 रुपयांपर्यंत सूट देत आहे.

या ऑफरमध्ये 25,000 रुपयांपर्यंत रोख सवलत, 10,000 रुपयांचा एक्सचेंज बोनस आणि 5,000 रुपयांची कॉर्पोरेट सूट समाविष्ट आहे. एकंदरीत कंपनीच्या माध्यमातून टाटा टियागो या कारवर व्हेरियंटनुसार वेगवेगळे डिस्काउंट दिले जात आहे.

40 हजार रुपयांपासून ते 60 हजार रुपयांपर्यंतची डिस्काउंट ऑफर कंपनीकडून उपलब्ध करून देण्यात आली आहे. या गाडीची एक्स शोरूम किंमत ही 5.65 लाख रुपयांपासून सुरू होते आणि टॉप मॉडेल व्हेरिएंट ची किंमत ही जवळपास 8.60 लाख रुपयांपर्यंत जाते. मात्र ग्राहकांना या ऑफरचा लाभ घेऊन ही गाडी कमी किमतीत खरेदी करता येणार आहे. पण ही ऑफर मे महिन्यापूरतीच मर्यादित राहणार आहे.

Ahmednagarlive24 Office