ऑटोमोबाईल

बुलेट प्रेमींसाठी आनंदाची बातमी! Royal Enfield नवीन वर्षात लॉन्च करणार ‘या’ तीन नवीन बाईक्स

Published by
Ahmednagarlive24 Office

Royal Enfield Bikes 2024 : रॉयल एनफिल्ड ही देशातील एक प्रमुख टू व्हीलर निर्माती कंपनी आहे. या कंपनीची बुलेट ही सर्वाधिक लोकप्रिय बाईक आहे. देशात रॉयल एनफिल्डच्या बुलेटची मोठी क्रेझ आहे. विशेषता 350 सीसीच्या बुलेटची आणि क्लासिक बाईकची बाजारात मोठी मागणी आहे. तरुणांना बुलेटची स्वारी विशेष आवडते. या गाडीची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढतच आहे.

दरम्यान जर तुम्हीही रॉयल एनफिल्डची बाईक खरेदी करण्याच्या मूडमध्ये असाल तर तुमच्यासाठी एक अतिशय आनंदाची आणि कामाची बातमी समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार रॉयल एनफिल्ड कंपनी नवीन वर्षात एक मोठा धमाका करणार आहे. ही कंपनी नवीन वर्षात अर्थातच 2024 मध्ये तीन नवीन बाइक्स लाँच करणार आहे.

यामुळे जर तुम्हाला ही रॉयल इन्फिल्डची बाईक खरेदी करायची असेल तर नवीन वर्षात तुमच्यासाठी नव्याने लॉन्च झालेल्या बाईक्स देखील उपलब्ध होणार आहेत. मीडिया रिपोर्टनुसार रॉयल एनफिल्ड कंपनी नवीन वर्षात शॉटगन 650, स्क्रंबलर 650 आणि हंटर 450 या तीन बाईक लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. आता आपण या तिन्ही बाईकच्या विशेषता थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

रॉयल एनफील्ड शॉटगन 650: Royal Enfield ही देशातील एक नामांकित ऑटो कंपनी आहे. ऑटोमोबाईल क्षेत्रात या कंपनीचे आपले एक विशेष वर्चस्व आहे. या कंपनीचा एक मोठा चाहता वर्ग आपल्या देशात पहायला मिळतो. दरम्यान ही कंपनी नवीन वर्षात Shotgun 650 ही नवीन बाईक लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. या बाईक मध्ये पुढील व्हिल 18-इंचाचे आणि मागील 17-इंचाचे राहणार आहे.

या नव्याने लॉन्च होणाऱ्या बाइकमध्ये 648cc पॅरलल-ट्विन, ऑइल-कूल्ड इंजिन दिले जाणार आहे. हे इंजिन 47ps पॉवर आणि 52.3Nm टॉर्क जनरेट करण्यास सक्षम राहणार असा दावा केला जात आहे.

तसेच या बाईकमध्ये ट्रिपल नेव्हिगेशनसह सेमी डिजिटल इन्स्ट्रुमेंट कन्सोल, एलईडी हँड लॅम्प, टेल लॅम्प, टर्न इंडिकेटर, ब्लॅक फिनिश्ड अलॉय व्हील, ड्युअल सिटिंग कॉन्फिगरेशन आणि मस्क्यूलर फ्युएल टँक उपलब्ध करून दिले जाणार असल्याचे वृत्त मीडिया रिपोर्ट मधून समोर आले आहे.

Royal Enfield Scrambler 650: Royal Enfield ही कंपनी Scramble 650 ही नवीन गाडी 2024 मध्ये लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. ही गाडी वेळोवेळी चाचणी दरम्यान पाहायला मिळाली आहे. या गाडीची भारतीय रस्त्यांवर देखील चाचणी झाली आहे. मीडिया रिपोर्ट मध्ये दिलेल्या माहितीनुसार, या नवीन बाइकमध्ये टू-इन-वन एक्झॉस्ट सिस्टम, टेक आणि रोल शीट आणि ब्लॉक पॅटर्न टायर्स दिले जाणार आहेत.

ही बाईक टूरिंग आणि ऑफरोडिंगसाठी विशेष खास राहणार असा दावा केला जात आहे. ज्या लोकांना ऑफरोडिंगसाठी बाईक खरेदी करायची असेल त्यांच्यासाठी ही बाईक सर्वात बेस्ट राहील असे देखील मत व्यक्त होत आहे.

रॉयल एनफील्ड हंटर 450: रॉयल एनफिल्ड हंटर 450 ही नवीन बाईक पुढील वर्षी बाजारात दाखल करणार आहे. ही गाडी ऑफ रोड वापरासाठी सर्वोत्कृष्ट राहणार आहे. ही एक नवीन रोडस्टर गाडी राहणार आहे. या नव्याने लॉन्च होणाऱ्या बाईकमध्ये 452cc सिंगल-सिलेंडर दिले जाणार आहे.

या बाईकमध्ये लिक्विड-कूल्ड DOHC फोर-व्हॉल्व्ह इंजिन उपलब्ध करून दिले जाणार आहे. हे इंजिन 40.02ps पॉवर आणि 40Nm टॉर्क जनरेट करण्यास सक्षम असेल असा दावा कंपनीने केला आहे. ही बाईक टूरिंगसाठी बेस्ट ऑप्शन राहणार आहे. या नव्याने लॉन्च होणाऱ्या बाईकचा लूक हा खूपच खास राहणार आहे.

Ahmednagarlive24 Office