हीरो कंपनीच्या स्प्लेंडर बाईकची एक वेगळीच क्रेझ आहे. तरुणाईमध्ये या गाडीचे खास आकर्षण आहे. किंमत, मायलेज, टिकाऊपणा आदी गोष्टींमुळे ही बाईक खास विशेष बनून राहिली. आता स्प्लेंडर प्रेमींसाठी एक खास बातमी आली आहे. स्प्लेंडर प्लस बाइक विषयी आपण येथे माहिती पाहणार आहोत.
या बाईकचं वैशिष्ट्य काय आहे?
या बाईकचे मायलेज अप्रतिम असून त्याचे सौंदर्यही तितकेच अप्रतिम आहे.
माइलेज व परफॉर्मेंस
उत्कृष्ट मायलेज ही स्प्लेंडर प्लसची खास ओळख आहे. शहरातील प्रवास असो किंवा लांब प्रवासासाठी हा एक उत्तम पर्याय आहे. त्याची इंजिन की क्षमता उत्तम आहे.
स्टाइलिश डिझाईन
बाइकचे एकदम स्टाईलिश डिझाईन आहे. उत्तम मायलेज, उत्तम इंजिन क्षमता आणि आकर्षित करणी डिझाईन यामुळे स्प्लेंडर प्लस जास्त लोकप्रिय झाली आहे.
किमतीबाबत नवीन अपडेट
आपल्यापैकी ज्यांना स्प्लेंडर प्लस घायची आहे त्यांच्यासाठी ही किंमत अगदीच कमी वाटेल अशी आहे. या बाईकची सुरुवातीची किंमत 73,481 रुपये आणि टॉप-एंड व्हेरियंटची किंमत 74,801 रुपये आहे. ही किंमत स्प्लेंडर प्लस ला बाजारात खऱ्या अर्थाने बजेट-फ्रेंडली पर्याय बनवते.
किंमत आणि चांगले मायलेज
कमी किंमत आणि चांगले मायलेज असलेल्या मोटारसायकलींचा विचार केला तर लोकांच्या ओठावर पहिलं नाव येतं ते हिरो स्प्लेंडरचं. हीरो मोटोकॉर्पची कम्युटर बाईक बऱ्याच काळापासून देशात सर्वाधिक विकली जाणारी मोटारसायकल आहे. 100 सीसी मॉडेलला स्प्लेंडर प्लस आणि 125 सीसी मॉडेलला सुपर स्प्लेंडर असे नाव देण्यात आले आहे.