Luxury Car Launch : गेल्या काही वर्षांमध्ये भारतात लक्झरी कारची विक्री वाढली आहे. अनेक नामांकित कंपन्यांच्या लक्झरी कार आता भारतीय बाजारात धुमाकूळ घालत आहेत. दरम्यान येत्या नवीन वर्षात अर्थातच 2024 मध्ये अनेक जण लक्झरी कार खरेदी करण्याच्या तयारीत आहेत.
जर तुम्हीही नवीन वर्षात लक्झरी कार खरेदी करण्याच्या तयारीत असाल तर तुमच्यासाठी एक अतिशय कामाची आणि गोड बातमी समोर आली आहे. मर्सिडीज-बेंझ नवीन वर्षात एक नवीन लक्झरी कार लॉन्च करणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार ही कंपनी नवीन वर्षात एक मोठा धमाका करण्यास तयार आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, कंपनी 8 जानेवारी 2024 ला लक्झरी कार GLS फेसलिफ्ट SUV लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. या फेसलिफ्ट मॉडेलमध्ये अनेक नवीन फीचर्स समाविष्ट राहणार आहेत. अनेक नवीन वैशिष्ट्यांसह या लक्झरी कारच्या बाहेरील भागात कॉस्मेटिक अपग्रेड देखील पाहायला मिळू शकतात असा दावा मीडिया रिपोर्ट मध्ये करण्यात आला आहे.
विशेष म्हणजे कंपनीची ही नवीन लक्झरी कार सेव्हन सीटर राहणार आहे. या SUV मध्ये Catalana Brown आणि Bahia Brown थीम असलेली अपहोल्स्ट्री पर्याय दिले जाण्याची दाट शक्यता आहे. ट्रिम पर्यायांमध्ये हाई-ग्लॉस ब्राउन लिंडन वुड आणि मॅन्युफॅक्टूर पियानो लैकर फ्लोइंग लाईन्स समाविष्ट आहेत.
दरम्यान मीडिया रिपोर्ट्स मध्ये या नव्याने लॉन्च होणाऱ्या लक्झरी कारच्या किमती बाबत देखील एक अंदाज वर्तवण्यात आला आहे. या नव्याने लॉन्च होणाऱ्या लक्झरी कारची किंमत सुमारे 1.5 कोटी रुपये राहील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
या नवीन मर्सिडीज-बेंझ GLS मध्ये काही बदल देखील केले जाणार आहेत. सध्याच्या मॉडेलच्या तुलनेत या गाडीच्या स्टाइलमध्ये किरकोळ स्वरूपाचा बदल अपेक्षित आहे. ग्रिलमधील 4 आडव्या लूव्हर्सना सिल्व्हर शॅडो फिनिश देण्यात येईल अशी माहिती समोर आली आहे.
नवीन कारमध्ये फ्रंट बंपर हाय-ग्लॉस ब्लॅक सराउंडसह एअर इनलेट ग्रिल्स असतील. मागील बाजूस, टेललॅम्प्सना 3 क्षैतिज ब्लॉक पॅटर्न मिळतात आणि हेडलॅम्प्सना नवीन LED पॅटर्न देण्यात येणार आहे. नवीन GLS मध्ये हिमालया ग्रे रंगाचे नवीन 20-इंच चाक दिले जाणार आहेत.
या फेसलिफ्टेड GLS च्या केबिनला अपडेटेड इन्फोटेनमेंट दिले जाणार आहे. जे की क्लासिक, स्पोर्टी आणि डिस्क्रीट मोडसह MBUX च्या नवीनतम आवृत्तीवर चालणार आहे. याशिवाय, लक्झरी कारमध्ये एक नवीन ‘ऑफ-रोड’ मोड जोडण्यात आला असल्याचे बोलले जात आहे.
जो की 360 डिग्री कॅमेऱ्यातून समोरचा सीन स्क्रीनवर पाठवणार आहे. यामध्ये कंपनीच्या स्वाक्षरीचे पारदर्शक बोनेट असेल जे रस्त्याच्या बाहेरच्या परिस्थितीत मदत करेल. ही कार विद्यमान 3.0-लिटर, डिझेल इंजिनसह ऑफर केली जाऊ शकते असा दावा यावेळी मीडिया रिपोर्ट मध्ये करण्यात आला आहे. एकंदरीत नवीन लक्झरी कार खरेदी करणाऱ्यांना पुढल्या वर्षी एक नवीन पर्याय उपलब्ध होणार आहे.