Mahindra Scorpio : स्कॉर्पिओ चाहत्यांसाठी आनंदाची बातमी! मे महिन्यात एक लाख रुपयांपर्यंत सूट; जाणून घ्या कोणत्या प्रकारावर?

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Mahindra Scorpio : तुम्ही नजीकच्या भविष्यात महिंद्रा स्कॉर्पिओ खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण महिंद्रा तुम्हाला आता त्यांच्या कारवर मोठा डिस्काउंट ऑफर करत आहे, या ऑफर अंतर्गत तुम्ही कार खरेदीवर मोठी बचत करू शकता. कपंनी सध्या किती सूट देत आहे आणि कोणत्या मॉडेलवर देत आहे पाहूया…

महिंद्र स्कॉर्पिओ ही भारतीय ग्राहकांमध्ये सर्वाधिक लोकप्रिय एसयूव्ही आहे. विक्रीच्या बाबतीतही, महिंद्रा स्कॉर्पिओ गेल्या महिन्यात मध्यम आकाराच्या एसयूव्ही सेगमेंटमध्ये अव्वल होती. याशिवाय महिंद्रा स्कॉर्पिओ ही कंपनीची सर्वाधिक विक्री होणारी कार आहे. दरम्यान, मे महिन्यात कंपनी महिंद्रा स्कॉर्पिओ N वर 1 लाख रुपयांपर्यंतची रोख सूट देत आहे. ही सूट MY 2023 वर उपलब्ध आहे. लक्षात घ्या महिंद्रा स्कॉर्पिओ N च्या MY 2024 वर कोणतीही सूट उपलब्ध नाही. Mahindra Scorpio N वर उपलब्ध असलेल्या डिस्काउंट ऑफर्सबद्दल सविस्तर जाणून घेऊया…

कंपनी महिंद्रा स्कॉर्पिओ N च्या Z8 आणि Z8L डिझेल व्हेरियंट 4WD वर 1 लाख रुपयांची कमाल रोख सूट देत आहे. तर कंपनी Z8 आणि Z8L च्या रियर व्हील ड्राइव्ह पेट्रोल आणि डिझेल व्हेरियंटवर 60,000 रुपयांची सूट देत आहे. जर आपण पॉवरट्रेनबद्दल बोललो तर, ग्राहकांना महिंद्रा स्कॉर्पिओमध्ये 2 इंजिनचा पर्याय मिळतो. पहिले 2.0-लिटर टर्बो पेट्रोल इंजिन जे जास्तीत जास्त 203bhp पॉवर जनरेट करण्यास सक्षम आहे. तर दुसरे 2.2-लिटर डिझेल इंजिनसह सुसज्ज आहे जे जास्तीत जास्त 175bhp पॉवर जनरेट करू शकते.

वैशिष्ट्ये 

जर आपण महिंद्रा स्कॉर्पिओ N च्या वैशिष्ट्यांबद्दल बोललो तर, एसयूव्हीच्या आतील भागात, ग्राहकांना 8-इंचाची टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, ड्युअल झोन क्लायमेट कंट्रोल, क्रूझ कंट्रोल, वायरलेस फोन चार्जिंग आणि 360-डिग्री सारखी वैशिष्ट्ये मिळतात. याशिवाय कारमध्ये कॅमेरा, स्टीयरिंग माउंटेड कंट्रोल्स, सनरूफ आणि सेमी डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर देखील आहेत. त्याच वेळी, सुरक्षेसाठी, कारमध्ये एकाधिक एअरबॅग आणि मागील पार्किंग कॅमेरा प्रदान करण्यात आला आहे. Mahindra Scorpio N ची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत 13.60 लाख ते 24.54 लाख रुपयांपर्यंत आहे.