खुशखबर ! ‘ही’ कंपनी लॉन्च करणार भारतातील पहिली ऑटोमॅटिक सीएनजी कार, आता गिअर बदलण्याची गरज राहणार नाही

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

India First CNG Automatic Car : कार खरेदी करू इच्छिणाऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाचे आणि मोठे अपडेट समोर आले आहे. विशेषता ज्यांना सीएनजी कार खरेदी करायची असेल त्यांच्यासाठी ही बातमी खूपच खास राहणार आहे.

खरे तर भारतात सीएनजी कारचा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे. मात्र आजही भारतीय बाजारात ऑटोमॅटिक सीएनजी कार लाँच झालेली नाही. ऑटोमॅटिक गिअर बॉक्स नसल्याने ग्राहकांना मॅन्युअल गिअरबॉक्स वाली सीएनजी कार चालवावी लागत आहे.

यामुळे ग्राहकांच्या माध्यमातून सीएनजी कार देखील ऑटोमॅटिक गिअर बॉक्ससोबत बाजारात लॉन्च झाली पाहिजे अशी मागणी गेल्या काही वर्षांपासून सातत्याने केली जात आहे. दरम्यान याच पार्श्वभूमीवर टाटा कंपनीने भारतातील पहिली ऑटोमॅटिक ट्रान्समिशन वाली सीएनजी कार लॉन्च करण्याचा निर्णय घेतला आहे.

कंपनीने याबाबत महत्त्वाची अपडेट दिली आहे. कंपनीकडून मिळालेल्या माहितीनुसार, टाटा टियागो सीएनजी आणि टाटा टिगर सीएनजी या गाड्यांमध्ये आता ऑटोमॅटिक ट्रान्समिशन उपलब्ध करून दिले जाणार आहे. यामुळे आता ग्राहकांना सीएनजी व्हेरिएंट मध्ये देखील ऑटोमॅटिक ट्रान्समिशन मिळणार आहे.

परिणामी आता सीएनजी गाड्या देखील बिना गिअर बदलता सुसाट चालवता येणार आहे. कंपनीने याबाबतची माहिती सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. याबाबतचा व्हिडिओ कंपनीने शेअर केला आहे. टाटा टियागो CNG आणि टाटा टिगर CNG गाड्यांमध्ये ऑटोमॅटिक ट्रान्समिशन उपलब्ध झाल्यानंतर या देशातील पहिल्या ऑटोमॅटिक सीएनजी कार बनणार आहेत.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, यात XT आणि XZ+ मध्ये ऑटोमेटेड मॅन्युअल ट्रान्समिशन (AMT) ऑप्शन दिला जाऊ शकतो. मात्र या गाड्यांच्या इंजिन मध्ये कोणताच बदल होणार नसल्याचे बोलले जात. फिचर्स मध्ये थोडेफार बदल राहणार आहेत. सध्या टाटा Tiago सीएनची एक्स-शोरूम किंमत 6.54 लाख रुपयांपासून सुरू होते,

तर Tigor सीएनजी एक्स-शोरूम किंमत 7.79 लाख रुपये आहे. परंतु जेव्हा या मॉडेलचे ऑटोमॅटिक व्हेरिएंट बाजारात येईल तेव्हाच ऑटोमॅटिक टाटा टियागो सीएनजी आणि टाटा टिगर सीएनजीच्या किमती समजू शकणार आहेत.