Two Wheeler Bike Discount : जर तुम्हीही बाईक खरेदी करण्याच्या तयारीत असाल तर तुमच्यासाठी एक अतिशय आनंदाची बातमी समोर आली आहे. ती म्हणजे देशातील काही नामांकित कंपन्यांनी आपल्या इलेक्ट्रिक टू व्हीलर गाड्यांवर बंपर सूट जाहीर केली आहे.
यामुळे तुमचे टू व्हीलर खरेदीचे स्वप्न स्वस्तात पूर्ण होऊ शकणार आहे. खरेतर सालाबादप्रमाणे यंदाही वर्ष संपण्याच्या आधीच स्टॉक क्लिअर करण्यासाठी देशातील अनेक नामांकित कंपन्यांनी आपल्या गाड्यांवर बंपर डिस्काउंट जाहीर केला आहे.
यामध्ये होंडा, बजाज, टीव्हीएस, यामाहा, हिरो या कंपन्यांचा समावेश आहे. या कंपन्याने आपल्या इलेक्ट्रिक टू व्हीलर वाहनांवर मोठा डिस्काउंट जाहीर केला आहे. या कंपन्यांनी अडीच हजारापासून ते 12,800 रुपयांपर्यंत घसघशीत डिस्काउंट जाहीर केला आहे.
अशा परिस्थितीत जर तुम्हाला नवीन इलेक्ट्रिक टू व्हीलर खरेदी करायची असेल तर लवकरात लवकर खरेदी करावी लागणार आहे. कारण की ही ऑफर लिमिटेड कालावधीसाठी चालू राहणार आहे. येत्या काही दिवसानंतर ही ऑफर बंद होईल आणि तुम्हाला या डिस्काउंटचा मग फायदा मिळणार नाही. दरम्यान आता आपण या कंपन्यांनी इलेक्ट्रिक टू व्हीलर बाइक वर किती सूट देण्याचा निर्णय घेतला आहे याविषयी थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
या कंपन्यांच्या इलेक्ट्रिक टू व्हीलर बाइक वर मिळणार मोठी सूट मिळालेल्या माहितीनुसार, होंडा या कंपनीने चालू वर्ष संपत असतानाच आपल्या ग्राहकांसाठी मोठा डिस्काउंट जाहीर केला आहे. या कंपनीच्या टू व्हीलर गाड्यांवर १२,८०० रुपयांपर्यंतचा डिस्काउंट मिळणार असल्याचे वृत्त समोर आले आहे.
बजाज ऑटो या कंपनीच्या गाड्यांवर देखील ३ हजार ते १० हजार रुपयांपर्यंतची सूट दिली जाणार असल्याचा दावा काही मीडिया रिपोर्ट मध्ये करण्यात आला आहे. टीव्हीएस मोटर्स या देशातील एका प्रतिष्ठित टू व्हीलर निर्माती कंपनीच्या माध्यमातून देखील इलेक्ट्रिक टू व्हीलर खरेदीवर ४,००० रुपयांपर्यंतची सूट दिली जाणार असल्याचे वृत्त समोर आले आहे.
यामाहा या कंपनीच्या दुचाकीवर सुद्धा ३ हजार ते ५ हजार रुपयांपर्यंत डिस्काउंट दिला जाणार असा मोठा दावा मीडिया रिपोर्ट मध्ये करण्यात आला आहे. हीरो मोटोकॉर्प कंपनीच्या टू व्हीलर गाड्यांवर सुद्धा २,५०० ते ३,००० रुपयांपर्यंतचा डिस्काउंट दिला जाणार असल्याचा दावा केला जात आहे.