गुड न्युज ! जानेवारी अखेरपर्यंत भारतीय बाजारात लॉन्च होणार ‘या’ 2 बाईक, वाचा या बाईकच्या विशेषता

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

New Bike Launching : भारतीय बाजारात अलीकडे इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढू लागला आहे. इलेक्ट्रिक कार आणि इलेक्ट्रिक स्कूटर बाजारात विशेष लोकप्रिय होत आहेत. मात्र असे असले तरी अजूनही पेट्रोल वाहनांची क्रेझ भारतात कायम आहे. अनेकांना पेट्रोल वाहनच आवडते.

दुसरे एक महत्त्वाचे कारण म्हणजे अजूनही इलेक्ट्रिक वाहन ही प्रारंभिक टप्प्यात आहेत. यामुळे बाजारात इलेक्ट्रिक वाहनांचे ऑप्शन्स खूपच लिमिटेड आहेत. मात्र हळूहळू इलेक्ट्रिक वाहनांचे देखील शेकडो ऑप्शन्स ग्राहकांपुढे राहतील आणि तेव्हा खऱ्या अर्थाने इलेक्ट्रिक वाहनांना डिमांड येईल. दरम्यान जर तुम्हीही या नवीन वर्षात टू व्हीलर खरेदी करण्याच्या तयारीत असाल,

या नवीन वर्षात नवीन बाईक खरेदी करण्याचा तुमचा प्लॅन असेल तर तुमच्यासाठी एक अतिशय महत्त्वाची बातमी समोर येत आहे. ती म्हणजे देशातील दोन नामांकित कंपन्या आपल्या नवीन बाईक्स लॉन्च करणार आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार जानेवारी 2024 अखेरपर्यंत रॉयल एनफिल्ड आणि हिरो या दोन कंपन्या आपल्या नवीन गाड्या बाजारात लॉन्च करणार आहेत. यामुळे जर तुम्ही या चालू महिन्यात नवीन टू व्हीलर खरेदी करण्याच्या तयारीत असाल तर गाडी खरेदी करण्यापूर्वी ही बातमी पूर्णपणे वाचून जा.

कोणत्या बाईक्स होणार लॉन्च

रॉयल इन्फिल्ड शॉटगन 650 : भारतात रॉयल एनफिल्ड गाड्यांची किती क्रेज आहे हे तुम्हाला सांगण्याचे काही कारण नाही. रॉयल एनफिल्ड ही देशातील एक लोकप्रिय वाहन निर्माता कंपनी आहे. या कंपनीच्या बाईक्स तरुणाईला अक्षरशा वेळ लावत आहेत. कंपनीची लोकप्रिय बुलेट आणि क्लासिक गेल्या अनेक वर्षांपासून ग्राहकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहेत. दरम्यान कंपनी या चालू महिन्यात शॉटगन 650 ही नवीन बाईक लॉन्च करणार असे वृत्त समोर आले आहे.

यामध्ये 648cc समांतर ट्विन 4-स्ट्रोक SOHC एअर-कूल्ड इंजिन उपलब्ध करून दिले जाणार आहे. बाईकचे हे लेटेस्ट इंजिन 47PS ची कमाल पॉवर आणि 52Nm चा पीक टॉर्क जनरेट करण्यास सक्षम राहणार असा दावा केला जात आहे.

या मोटरसायकलमध्ये 6-स्पीड गिअरबॉक्स राहणार आहेत. Royal Enfield Shotgun 650 मध्ये राउंड LED हेडलॅम्प, ट्रिपर नेव्हिगेशन पॉड, फ्लॅट हँडलबार, मिड सेट फूटपेग्स, USD फ्रंट फोर्क्स, ट्विन शॉक रिअर ऍब्सॉर्बर, 18-इंच फ्रंट आणि 19-इंच रियर व्हील आणि ड्युअल चॅनल ABS यांसारखें फीचर्स राहणार अशी माहिती समोर येत आहे.

हिरो मॅव्हरिक 440 : हिरो ही भारतातील सर्वात मोठी दुचाकी उत्पादक कंपनी आहे. या कंपनीचे करोडो ग्राहक आहेत. या कंपनीच्या अनेक टुविलर बाजारात विशेष लोकप्रिय आहेत. या कंपनीने मध्यमवर्गीयांसाठी अनेक लोकप्रिय टू व्हीलर बाजारात लॉन्च केल्या आहेत. दरम्यान Hero MotoCorp ही कंपनी जानेवारी अखेरपर्यंत आणखी एक नवीन टू व्हीलर बाजारात लॉन्च करणार असे वृत्त समोर आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार हार्ले डेव्हिडसनच्या भागीदारीत कंपनीच्या माध्यमातून 500cc सेगमेंट मध्ये नवीन बाईक लॉन्च केली जाणार आहे. ही बाईक लॉन्च करून 500cc सेगमेंट मध्ये कंपनी आपला प्रवेश सुनिश्चित करणार आहे.

हिरो Mavrick 440 ही बाईक लॉन्च करून 500cc सेगमेंट मध्ये प्रवेश करणार आहे. Hero Maverick ला 440cc, सिंगल सिलेंडर, एअर-ऑइल कूल्ड इंजिन असेल. हे जास्तीत जास्त 27bhp पॉवर आणि 38Nm कमाल टॉर्क जनरेट करते. हे 6-स्पीड गिअरबॉक्सशी जोडलेले आहे.