Maruti Suzuki Offer Discount : जर तुम्हाला नवीन कार घ्यायची असेल तर तुमच्याकडे अनेक पर्याय आहेत. अनेक कंपन्या त्यांच्या वाहनांवर मोठ्या प्रमाणात सूट आणि ऑफर देत आहेत. या यादीत मारुती सुझुकीच्या नावाचा समावेश आहे.
गेल्या महिन्यात मारुती सुझुकीने नवीन, चौथ्या जनरेशनची स्विफ्ट लॉन्च केली होती. ज्यावर आता बंपर डिस्काउंट ऑफर केला जात आहे. याशिवाय अनेक वाहनांवर ऑफर्स आणि सवलतीही उपलब्ध आहेत. आजच्या या बातमीद्वारे आपण कोणत्या वाहनांवर किती ऑफर आणि सूट मिळत आहे जाणून घेणार आहोत, चला तर मग…
मारुती अल्टो K10 ची किंमत 3.99 लाख ते 5.96 लाख रुपयांच्या दरम्यान आहे. याच्या ऑटोमॅटिक व्हेरियंटवर 55,000 रुपयांपर्यंत, मॅन्युअल व्हेरिएंटवर 50,000 रुपयांपर्यंत आणि CNG पर्यायांवर 48,000 रुपयांपर्यंत सूट दिली जात आहे.
याशिवाय सेलेरियो ऑटोमॅटिक व्हर्जनवर ऑफर्स आणि डिस्काउंटही उपलब्ध आहेत. हे वाहन 58,000 रुपयांपर्यंत लाभांसह उपलब्ध आहे. तर मॅन्युअल आणि सीएनजी व्हेरियंटवर 53,000 रुपयांपर्यंत सूट आहे.
वॅगन आर दोन इंजिन पर्यायांसह उपलब्ध आहे. ऑटोमॅटिक व्हेरियंटसाठी 58,000 रुपये, मॅन्युअल व्हेरिएंटसाठी 53,000 रुपये आणि CNG व्हेरिएंटसाठी 43,000 रुपयांपर्यंतचे फायदे मिळत आहेत.
Dezire च्या सध्याच्या मॉडेलच्या ऑटोमॅटिक व्हेरियंटवर 30,000 रुपयांपर्यंत आणि मॅन्युअल व्हेरिएंटवर 25,000 रुपयांपर्यंतच्या ऑफर उपलब्ध आहेत. या वाहनाच्या CNG प्रकारावर कोणतीही ऑफर उपलब्ध नाही.
तर Brezza फक्त 10,000 रुपयांच्या एक्सचेंज बोनससह कॉम्पॅक्ट SUV च्या पेट्रोल व्हेरियंटवर उपलब्ध आहे. या महिन्यात, मारुती S-Presso वर 58,000 पर्यंत सूट उपलब्ध आहे, मॅन्युअल प्रकारांवर 53,000 पर्यंत आणि CNG वाहनांवर Rs 46,000 पर्यंतची सूट उपलब्ध आहे. S-Presso ची किंमत 4.26 लाख ते 6.12 लाख रुपयांच्या दरम्यान सुरु होते.