ऑटोमोबाईल

‘या’ भारतीय कंपनीने लॉन्च केल्या 4 इलेक्ट्रिक स्कूटर! मिळतील कमी किमतीत व सोबत मिळेल 5 वर्षाची वॉरंटी

Published by
Ajay Patil

इलेक्ट्रिक वाहनांचा वापर आता दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणावर वाढताना आपल्याला दिसून येत असून त्यामध्ये इलेक्ट्रिक स्कूटर पासून तर इलेक्ट्रिक दुचाकी व कार्सचा देखील समावेश आहे. विशेष म्हणजे केंद्र सरकारच्या माध्यमातून देखील इलेक्ट्रिक वाहनांच्या उत्पादनाला आणि वापराला प्रोत्साहन देण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.

कारण पेट्रोल डिझेलच्या वाढत्या किमतीच्या पार्श्वभूमीवर इलेक्ट्रिक वाहनांचा वापर हा आर्थिक दृष्टिकोनातून  फायद्याचा आहेच परंतु पर्यावरणाच्या दृष्टीकोनातून देखील इलेक्ट्रिक वाहने फायद्याचे ठरतील अशी शक्यता आहे. तसेच हळूहळू आता इलेक्ट्रिक वाहनांच्या चार्जिंग स्टेशन उभारणीकडे देखील मोठ्या प्रमाणावर कल असल्याचे दिसून येत असल्याने येणारा काळ हा इलेक्ट्रिक वाहनांचा असेल हे मात्र निश्चित.

त्यामुळे भविष्यकालीन गरज ओळखून अनेक वाहन निर्मिती कंपन्या इलेक्ट्रिक वाहनांची निर्मिती करत असून त्यांची लॉन्चिंग देखील करत आहेत. याचप्रमाणे भारतातील जीटी फोर्स हा एक ईव्ही स्टार्टअप असून या कंपनीने भारतीय बाजारपेठेमध्ये एंट्री लेव्हल इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च केले असून कंपनीच्या माध्यमातून या सर्व इलेक्ट्रिक स्कूटर्सला वेगस, राईड प्लस, वन प्लस प्रो आणि ड्राईव्ह प्रो अशी नावे दिली असून यास इलेक्ट्रिक स्कूटरच्या किमती देखील परवडण्यासारख्या आहेत.

 जीटी फोर्सने लॉन्च केल्या या इलेक्ट्रिक स्कूटर

1- जीटी वेगस ही कमी वेग असलेली इलेक्ट्रिक स्कूटर असून तिची किंमत देखील कमी आहे. या इलेक्ट्रिक स्कूटरच्या किमती बद्दल बोलायचे झाले तर ती फक्त 55 हजार 555 रुपये इतकी ठेवण्यात आली आहे. या स्कूटरमध्ये रिव्हर्स मोड, पार्क असिस्ट, यूएसबी चार्जिंग आणि अँटिथेप्ट अलार्म सारख्या सुविधा देण्यात आलेले आहेत. तसेच या स्कूटरमध्ये बीएलडीसी मोटर असून ही स्कूटर 1.5 kWh बॅटरीसह येते व एका चार्जर 70 किलोमीटरची रेंज देण्यास सक्षम आहे व या स्कूटरचा टॉप स्पीड 25 किलोमीटर प्रतितास आहे.

2- जीटी राईड प्लस जीटी फोर्सच्या या स्कूटरमध्ये 2.2 kWh ची बॅटरी मिळते व कंपनी या स्कूटर बद्दल दावा करते की तुम्हाला एका चार्जवर ही 95 किलोमीटरची रेंज देते. वर बघितलेल्या वेगस या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये जी वैशिष्ट्ये आहेत ती सर्व वैशिष्ट्य या राईड प्लसमध्ये देण्यात आलेली आहेत. जीटी राईड प्लस इलेक्ट्रिक स्कूटरची किंमत 65 हजार 555 इतकी ठेवण्यात आली आहे.

3- जीटी वन प्लस प्रो या स्कूटरमध्ये कंपनीच्या माध्यमातून 2.5 kWh बॅटरी देण्यात आली असून ही एका चार्जर 110 किलोमीटर पर्यंत धावू शकते असा दावा कंपनीच्या माध्यमातून करण्यात आला असून तिचा टॉप स्पीड 70 किलोमीटर प्रति तास इतका आहे. या इलेक्ट्रिक स्कूटरची किंमत 76 हजार 555 इतकी आहे.

4- जीटी ड्राईव्ह प्रो जीटी फोर्सची ही स्कूटर फ्लॅगशिप स्कूटर असून या स्कूटरमध्ये वन प्लस प्रो प्रमाणे तुम्हाला सर्व फीचर्स मिळतात. या स्कूटरची किंमत 84 हजार पाचशे पंचावन्न रुपये इतकी ठेवण्यात आलेली आहे.

Ajay Patil