ऑटोमोबाईल

भारी ! आता लक्झरियसच नाही तर ‘या’ तीन स्वस्तातल्या कार मध्ये देखील आहे ADAS टेक्नलॉजी, जाणून घ्या…

Published by
Ahmednagarlive24 Office

भारतीय बाजारपेठ ही जगातील तिसरी सर्वात मोठी कार बाजारपेठ मानली जाते. मागील काही दिवसांचा जरी तपशील पाहिला तरी तुमच्या लक्षात येईल की विविध कमान्यांच्या हजारो कार विक्री झाल्या आहेत. विविध गोष्टींमुळे आता कार घेणे देखील सोपे झाले आहे.

आता अनेक कंपन्या आपल्या सेफ्टी, सुरक्षा बाबतीत काळजी घेत असून कार च्या सेफ्टीसाठी विविध गोष्टी इन्क्लुड करत आहेत. यापैकीच एक महत्वाची सेफ्टी फीचर्स म्हणजे ADAS टेक्नॉलॉजी. पूर्वी ही टेक्नॉलॉजी केवळ लक्झरी वाहनांमध्ये यायचे. परंतु आता हे काही कमी कितीमधील कार मध्ये देखील पाहायला मिळते. येथे आम्ही तुम्हाला भारतातील टॉप 3 परवडेबल ADAS कार्सची माहिती देणार आहोत.

ह्युंदाई वेन्यू :-ही कार सध्या मार्केटमध्ये धुमाकूळ घालत आहे. याची किंमत 12 ते 14 लाख रुपयांदरम्यान आहे. Hyundai Venue मध्ये ADAS टेक्नॉलॉजी आहे. सब-कॉम्पॅक्ट SUV अंतर्गत ही कार येते. Hyundai Venue एकूण पाच प्रकारांत ऑफर करण्यात आली असून ADAS टेक्नॉलॉजी फक्त त्याच्या टॉप व्हेरियंट SX O मध्ये दिले आहे. यातील लेव्हल 1 ADAS टेक्नॉलॉजी तुम्हाला पुढील व मागील टक्कर टाळणे, लेन डिपार्चर अलर्ट, लेन रिटर्न, लाइन मेंटेन, ड्रायव्हर अटेन्शन अलर्ट, हाय बीम असिस्ट आदी सुविधा देते.

होंडा सिटी :-  दुसऱ्या क्रमांकावर येते होंडा सिटी. याची किंमत 12.50 लाख ते 16.10 लाख रुपयांदरम्यान आहे. भारतीय मार्केटमध्ये सेडान सेगमेंटमध्ये ADAS टेक्नॉलजी देणारी ही पहिली सेडान आहे. या कार चे एकूण 4 व्हेरिएंट मार्केटमध्ये आहेत. या सर्व व्हेरिएंटमध्ये तुम्हाला ADAS टेक्नॉलिजी मिळते. यामध्ये देखील पुढील व मागील टक्कर टाळणे, लेन डिपार्चर अलर्ट, लेन रिटर्न, लाइन मेंटेन, ड्रायव्हर अटेन्शन अलर्ट, हाय बीम असिस्ट आदी सुविधा मिळतात.

होंडा एलिव्हेट :-  तिसऱ्या क्रमांकावर येते होंडा एलिव्हेट, यासह किंमत 14.85 लाख ते 21.24 लाख रुपयांदरम्यान आहे. तुम्हाला ADAS टेक्नॉलॉजी Honda एलिव्हेटच्या ZX या टॉप व्हेरियंटमध्ये मिळते. त्या खालील व्हेरिएंटमध्ये तुम्हाला ADAS तंत्रज्ञानाची सुविधा दिली जात नाही. Honda Elevate मध्ये 1.5 लीटर पेट्रोल इंजिन आहे जे 121 bhp आणि 145 Nm टॉर्क जनरेट करते. सध्या मार्केटमध्ये या कारची देखील क्रेझ आहे.

Ahmednagarlive24 Office