Hero New Bike : Hero MotoCorp ही देशातील एक लोकप्रिय वाहन निर्माता कंपनी आहे. कंपनीच्या अनेक गाड्यां लोकप्रिय आहेत. हिरो कंपनीच्या अनेक टू व्हिलर मध्यमवर्गीयांमध्ये लोकप्रिय आहेत. या कंपनीच्या बाईक आपल्या स्टायलिश लूक अन दमदार मायलेज यामुळे सर्वसामान्यांमध्ये खूपच पसंत केल्या जात आहेत. दरम्यान, Hero कंपनीने आपल्या ग्राहकांना एक मोठी भेट दिली आहे.
कंपनीच्या माध्यमातून एक नवीन बाईक लॉन्च करण्यात आली आहे. मध्यमवर्गीयांना केंद्रस्थानी ठेवून कंपनीने दमदार मायलेज वाली नवीन बाइक बाजारात उतरवली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, Hero Motocorp World 2024 मध्ये कंपनीने नवीन Xtreme 125R कम्युटर मोटरसायकल लॉन्च केली आहे. ही नव्याने लॉन्च झालेली बाईक खूपच स्टायलिश असून चांगले मायलेज देणार असा दावा होत आहे. विशेष बाब अशी की नव्याने लॉन्च झालेल्या Hero Xtreme 125R ची किंमत ही एक लाख रुपयांपेक्षा कमी आहे.
या बाईकची राष्ट्रीय राजधानी दिल्लीत 95,000 रुपये एवढी एक्स-शोरूम किंमत आहे. मात्र ही बाईकच्या सुरुवातीच्या मॉडेलची किंमत आहे. वॅरीयंटनुसार किमती वाढणार आहेत. ही नवी गाडी 125cc कम्युटर स्पेसच्या प्रीमियम रेंजमध्ये येते. ही गाडी बाजारात आधीपासूनच लाँच झालेल्या 125cc सेगमेंटमध्ये अनेक गाड्यांशी स्पर्धा करणार आहे.
Hero Extreme 125R च्या इंजिनबाबत आता आपण थोडक्यात माहिती पाहणार आहोत. कंपनीकडून मिळालेल्या माहितीनुसार या नवीन गाडीला नवीन 125cc सिंगल-सिलेंडर, एअर-कूल्ड इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन 8,250rpm वर 11.39bhp पॉवर जनरेट करण्यासाठी ट्यून केलेले आहे, जे 5-स्पीड गिअरबॉक्ससह जोडले गेले आहे. बाईकच्या फ्रंटला 37mm टेलिस्कोपिक फोर्क सस्पेन्शन वापरण्यात आले आहे. तसेच मागील बाजूस शोवा मोनोशॉक सस्पेन्शन वापरण्यात आले आहे.
जें की ड्रायव्हिंग एक्सप्रेस आणखी चांगला बनवणार आहे. ब्रेकिंग परफॉर्मन्सबाबत बोलायचं झालं तर ब्रेकिंग सिस्टम हे व्हेरियंटवर अवलंबून आहे. ही गाडी सिंगल फ्रंट डिस्क आणि ड्रम ब्रेक किंवा मागील बाजूस डिस्क ब्रेकच्या पर्यायासह बाजारात दाखल होणार आहे. बाईक सिंगल-चॅनल ABS सह येते, तर ड्युअल-चॅनल ABS प्रकार ₹99,500 रुपयांना उपलब्ध आहे. पण ही एक्स-शोरूम किंमत असेल. अर्थातच ऑन रोड प्राईस यापेक्षा अधिक राहणार आहे. ही बाईक लवकरच डीलर्सकडे उपलब्ध होणार आहे.