Hero लॉन्च करतंय 350 KM ची रेंज असणारी इलेक्ट्रिक बाईक, किंमत तर अगदी कमी, जाणून घ्या सविस्तर

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

आजकाल वाहन क्षेत्रामध्ये मोठी प्रगती होत चाललेली आहे. एकापेक्षा एक अशी जबरदस्त दुचाकी वाहने सध्या बाजारात येत आहेत. सध्या वाढत्या इंधनाच्या किमती पाहता लोकांचा कल इलेक्ट्रिक दुचाकींकडे वळलेला आहे.

परंतु बॅटरीची कमी रेंज किंवा जास्त किमती यामुळे अनेकांचे बजेट हुकते. त्यामुळे आता या लोकांसाठी खास बातमी आली आहे. हिरो कंपनीने आता एक शानदार इलेक्ट्रिक बाईक लॉन्च करणार आहे. याची किंमत अगदी कमी असेलच शिवाय एका चार्जमध्ये ही बाईक 350 किमीचे रेंज देईल. चला त्याबद्दल जाणून घेऊयात –

eMaestro Scooter :- हिरो जी इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च करणार आहे तिचे नाव आहे eMaestro. यामध्ये भारी फीचर्स तर असणारच आहेत, शिवाय किंमत कमी असल्याने ज्या लोकांकडे जास्त पैसे नाहीत ते देखील इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करू शकतील.

बॅटरी, रेंज व स्पीड :-हिरोने या इलेक्ट्रिक स्कूटरच्या बॅटरी आणि रेंजवर विशेष लक्ष दिले आहे. त्यासाठी कंपनीने यात शक्तिशाली 4kwh लिथियम आयन बॅटरी पॅक वापरला आहे. एकदा का बॅटरी पूर्णपणे चार्ज झाली तर ती 350 किलोमीटरपर्यंत प्रवास करू शकते. तीन ते चार तासात बॅटरी फुल चार्ज होते. कंपनीने eMaestro स्कूटरमध्ये 2000 वॅटची BLDC हब मोटर वापरली आहे. त्यामुळे ताशी 60 किलोमीटर वेगाने ही बाईक धावू शकते. सध्या या बाईकवर काम सुरु असून याची लॉन्चिंग डेट व फीचर्सबद्दल कोणतीही माहिती मिळालेली नाही.

किती असेल किंमत :-हिरो या इलेक्ट्रिक स्कूटरची किंमत साधारण 1 लाख रुपयांपर्यंत ठेवेल असा अंदाज आहे. ऑन-रोड किमतीत थोडी वाढ होईल. ज्यांना उत्तम बाईक व परवडेबल किमतीत बाईक खरेदी करायची असेल त्यांच्यासाठी हा उत्तम पर्याय असेल.