ऑटोमोबाईल

HIM-E : आली ! आली ! Royal Enfield ची पहिली इलेक्ट्रिक बाइक, जाणून घ्या सर्व काही

Published by
Ahmednagarlive24 Office

Royal Enfield electric bike HIM-E : रॉयल एनफिल्डच्या बाइक्सची क्रेझ किती आहे हे वेगळे सांगण्याची गरज नाही. तरुणांमध्ये तर या कंपनीच्या बाइक्सची जबर क्रेझ आहे. परंतु आता अनेक बाईक्स या इलेक्ट्रिक व्हर्जनमध्ये आल्या त्यामुळे आता रॉयल एनफिल्डप्रेमी ही बाईक कधी इलेक्ट्रिकमध्ये येईल याची वाट पाहत होते.

आता त्यांची प्रतीक्षा संपली आहे. कंपनीने आपली पहिली इलेक्ट्रिक बाईक लाँच केली आहे. इटलीतील मिलान येथील EICMA मोटर शोमध्ये रॉयल एनफिल्ड HIM-E चे प्रदर्शन होणार आहे. ही संपूर्ण ईव्ही बाईक आहे. मात्र, कंपनीने या बाईकची किंमत किंवा डिलिव्हरी बाबत काही माहिती जाहीर केलेली नाही. ही एक हाय-एंड बाईक आहे, जी खराब रस्त्यांवर उच्च कार्यक्षमता प्रदान करण्यासाठी खास डिझाइन करण्यात आली आहे.

बाइक मध्ये डर्ट लुक
Royal Enfield HIM-E ही कंपनीच्या हिमालयन मॉडेलची नवीन वर्जन असल्यासारखी दिसते. बाइकमध्ये फ्यूल टँकऐवजी बॅटरी सेटअप देण्यात आला आहे. यात स्पोक व्हील्स आहेत, त्यामुळे त्याचा लूक खूप खास बनला आहे. सुरक्षिततेसाठी मोटारसायकलच्या दोन्ही चाकांमध्ये डिस्क ब्रेक देण्यात आले आहेत. ही फंकी लुकवाली बाईक असून तिला डर्ट लुक देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

मोठ्या आकाराचे टायर व हेवी सस्पेंशन
बाइकमध्ये एक्ट्रा रबर टायर आहेत. यात मोठ्या आकाराचे टायर आहेत तसेच हेवी सस्पेंशन दिसत आहे. सध्या कंपनी या बाइकची चाचणी करत आहे. 2025 पर्यंत लोकांना ते चालवायला मिळेल असा अंदाज आहे. सध्या कंपनीने अधिकृत लॉन्चबद्दल कोणताही खुलासा केलेला नाही.

बाइकमध्ये आकर्षक गोल लाइट
बाईकमध्ये आकर्षक गोल लाईट देण्यात आले आहेत. त्याच्या आत अनेक छोटे बल्ब दिसतात. यात एलसीडी पॅनेल असेल. ही हाय-पॉवर बाईक सारखी दिसते. सिंगल चार्जवर याला जास्त ड्रायव्हिंग रेंज मिळण्याची शक्यता आहे. बाइकमध्ये नवीन स्टाईलची कर्व्ह सीट देण्यात आली आहे.

Ahmednagarlive24 Office