ऑटोमोबाईल

Honda Amaze 2024 : दिवाळीपर्यंत लॉन्च होणार लोकप्रिय सेडान Amaze चे नवीन मॉडेल ! मिळणार ही खास वैशिष्ट्ये

Published by
Ahmednagarlive24 Office

Honda Amaze 2024 : होंडा कार उत्पादक कंपनीची लोकप्रिय कार Amaze आता नवीन अवतारात पुन्हा एकदा लॉन्च होणार आहे. कंपनीकडून नवीन जनरेशन Amaze सेडान कारवर काम देखील सुरु केले आहे. कारमध्ये अनके बदल पाहायला मिळतील.

होंडा Amaze सेडान कारला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. 2018 मध्ये होंडाकडून त्यांच्या Amaze सेडान कारचे सेकंड जनरेशन मॉडेल लॉन्च करण्यात आले होते.

आता कंपनीकडून 2024 मध्ये नवीन Amaze लॉन्च केली जाणार आहे. दिवाळीपर्यंत ही कार बाजारात विक्रीसाठी येईल असा दावा करण्यात येत आहे.

होंडा नवीन जनरेशन Amaze डायमेंशन आणि डिझाइन

होंडा कार कंपनीकडून आगामी काळात त्यांची नवीन बदलांसह Amaze सेडान कार लॉन्च केली जाणार आहे. SUV Elevate सारख्याच प्लॅटफॉर्मवर तयार नवीन जनरेशन Amaze कार तयार करण्यात येईल. सध्याच्या Amaze सेडान कारला देण्यात येत असलेला 2,470 मिमी व्हीलबेस कायम ठेवला जाऊ शकतो.

नवीन जनरेशन Amaze सेडान कारमध्ये अनके बदल केले जाणार आहेत. सर्वात महत्वाचा बदल कारच्या डिझाईनमध्ये पाहायला मिळेल. कारचे डिझाईन अधिक आकर्षक बनवण्यात येईल.

नवीन जनरेशन Amaze वैशिष्ट्ये

नवीन जनरेशन Amaze सेडान कारमध्ये नवीन वैशिष्ट्ये दिले जाऊ शकतात. कारमध्ये वायरलेस अँड्रॉइड ऑटो आणि ऍपल कारप्लेसह 10.25-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टीम दिली जाईल.

तसेच क्रोम ग्रिल, मोठे एअर व्हेंट्स आणि आकर्षक एलईडी हेडलाइट्स, नवीनतम कार ORVM, शार्प बॉडी लाइन्स, स्टायलिश अलॉय व्हील्स आणि रॅप-अराउंड एलईडी टेललॅम्प्सने नवीन Amaze कार सुसज्ज असेल.

नवीन जनरेशन Amaze कोणाशी स्पर्धा करणार?

नवीन जनरेशन Amaze सेडान कार मारुती सुझुकी डिझायर आणि ह्युंदाई ऑरा कारशी टक्कर देईल. डिझायर आणि ऑरा कारमध्ये 1.2 L पेट्रोल इंजिन देण्यात येत आहे. नवीन जनरेशन Amaze मध्ये देखील शक्तिशाली इंजिन दिले जाईल.

नवीन जनरेशन Amaze इंजिन

सध्या होंडा कंपनीकडून Amaze सेडान कारमध्ये 1.2-लिटर, 4-सिलेंडर, नैसर्गिकरित्या एस्पिरेटेड पेट्रोल इंजिन देण्यात येत आहे. हे इंजिन 90 hp पॉवर आणि 110 Nm टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे. हेच इंजिन नवीन कारमध्ये कायम ठेवले जाऊ शकते. नवीन Amaze कारची एक्स शोरूम किंमत 7 लाख रुपये असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Ahmednagarlive24 Office