ऑटोमोबाईल

Honda ने आणली धमाकेदार ऑफर ! ‘या’ दोन फेमस कारवर ७५ हजारांचा डिस्काउंट

Published by
Ahmednagarlive24 Office

Discount Offers On Honda Cars : सणासुदीच्या काळात होंडा कार्स आपल्या कारवर मोठ्या प्रमाणात सूट देत आहे. संपूर्ण ऑक्टोबर महिन्यासाठी कंपनीच्या वाहनांवर सूट मिळणार आहे. होंडा ही आपल्या वाहनांवर कॅश डिस्काउंट,

कॉर्पोरेट बेनिफिट्स, एक्सचेंज ऑफर्स आणि इतर बेनिफिट्सच्या माध्यमातून ग्राहकांना आकर्षित करत आहे. मात्र ऑफर्स फक्त होंडा सिटी आणि होंडा अमेजवर आहेत. नुकत्याच लाँच झालेल्या होंडा एलिव्हेटवर कोणतीही ऑफर नाही.

ऑक्टोबरमध्ये होंडा सिटी आणि होंडा अमेझवर तुम्ही ७५,००० रुपयांपर्यंत बचत करू शकता. चला या ऑफर्सबद्दल जाणून घेऊयात –

होंडा सिटीवर डिस्काउंट

या महिन्यात होंडा सिटी (पेट्रोल व्हेरिएंट) वर ७५,००० रुपयांपर्यंत सूट मिळत आहे. कॅश डिस्काउंट, अॅक्सेसरीज, लॉयल्टी बोनस आणि कार एक्सचेंज अशा स्वरूपात ही सूट दिली जात आहे. यामध्ये २५ हजार रुपयांपर्यंत कॅश डिस्काउंट किंवा २६,९४७ रुपयांपर्यंत फ्री अॅक्सेसरीज,

४,००० रुपये कस्टमर लॉयल्टी बोनस, ६,००० रुपये होंडा कार एक्सचेंज बोनस, ५,००० रुपयांचा कॉर्पोरेट सूट, ५,००० रुपयांचा स्पेशल कॉर्पोरेट डिस्काउंट आणि २०,०१० रुपये एक्सचेंज बोनसचा समावेश आहे. होंडा सिटी हायब्रिडवर ही ऑफर उपलब्ध नाही.

Honda Amaze वर डिस्काउंट

होंडा अमेझवर आकर्षक डिस्काउंट दिला जात आहे. ऑक्टोबरमध्ये ५७,००० रुपयांपर्यंत ऑफर्स दिल्या जात आहेत. यामध्ये १५,००० रुपयांपर्यंत कॅश डिस्काउंट किंवा १८,१४७ रुपयांपर्यंत फ्री अॅक्सेसरीज,

४,००० रुपये कस्टमर लॉयल्टी बोनस, ३,००० रुपयांचा कॉर्पोरेट डिस्काउंट, २०,००० रुपयांचा स्पेशल कॉर्पोरेट डिस्काउंट आणि १५,००० रुपयांचा कार एक्सचेंज बोनसचा समावेश आहे.

* होंडा शाइन सेल्स

होंडाच्या मोटरसायकल देखील प्रचंड लोकप्रिय आहेत. नुकत्याच आलेल्या एका रिपोर्टनुसार होंडाच्या शाईन बाईकची ३० लाखांहून अधिक युनिट्सची विक्री झाली आहे. कंपनीसाठी ही एक मोठी अचिव्हमेंट आहे.

होंडाने पहिल्या ११ वर्षांत १५ लाख ग्राहक मिळवले. त्यानंतर पुढील ६.५ वर्षांत १५ लाख ग्राहकांचा टप्पा पार केला. होंडाच्या बाईक्स अत्यंत टिकाऊ व उत्तम मायलेज साठी ओळखल्या जातात. ग्रामीण भागात देखील होंडाची मोठी क्रेझ आहे.

Ahmednagarlive24 Office