लॉन्च होतेय Honda CB1000 Hornet , फीचर्स व लूकपुढे कावासाकी व यामाहाही फिक्या

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Honda CB1000 Hornet : दुचाकी क्षेत्रात आता भरपूर प्रगती झाली आहे. बदलत्या काळानुसार व तरुणांच्या आवडीनुसार कंपन्या आता बाईक डिझाईन करत आहेत. तरुणांना कसे आकर्षित करता येईल याकडे सर्वांचे लक्ष असते.

दुचाकी सेक्टर मधील होंडा कंपनी नेहमीच नवनवीन बाईक आणत असते. आता होंडा ने नुकतेच New Honda CB1000 Hornet चे EICMA 2023 शो मध्ये प्रदर्शन केले. एकदम स्पोर्टी लुक व दमदार इंजिनसह अनेक खास फीचर्स यात येऊ शकतात.

2024 च्या सुरुवातीलाच ती भारतात लाँच होईल. ही बाईक मार्केटमध्ये कावासाकी आणि यामाहा या दोन्ही बाईकला जोरदार टक्कर देईल.

कधी पर्यंत भारतात होईल लॉन्च

Honda CB1000 Hornet कधी लाँच होईल याबाबत निश्चित माहिती नाही. परंतु 2024 च्या सुरुवातीला भारतात लॉन्च केली जाऊ शकते असा अंदाज आहे. म्हणजेच जानेवारी किंवा फेब्रीवारीत ती लॉन्च होऊ शकते.

कलर ऑप्शन

होंडा CB1000 Hornet बी बाईक तुम्हाला तीन कलर ऑप्शन मध्ये मिळणार आहे. ग्रँड प्रिक्स रेड, मॅट इरिडियम ग्रे मेटॅलिक, पर्ल ग्लेअर व्हाईट अशा तीन कलर मध्ये ती आपल्याला मार्केटमध्ये उपलब्ध होईल.

भारी डिझाईन

होंडा CB1000R सारखेच होंडा CB1000 Hornet च्या डिझाइनमध्ये लो-स्लंग फुल-एलईडी हेडलॅम्प्स, फ्यूल टँक रिसेस आणि टेल सेक्शन आहे. बाईकच्या दोन्ही बाजूला दोन प्रोजेक्टर हँड लॅम्प आणि डीआरएलसारखे स्टायलिंग पॉईंट असल्याने बाईक एकदम आक्रमक स्टाईल देते.

जाणून घेऊयात फीचर्स

यात 5 इंचाचा टीएफटी डिस्प्ले सह स्मार्टफोन कनेक्टिव्हिटी, ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी, नेव्हिगेशन सिस्टिम आदी स्मार्ट फीचर्स यात देण्यात आले आहेत. कॉल अलर्ट, एसएमएस अलर्ट, ईमेल नोटिफिकेशन,

स्पीडोमीटर, टॅकोमीटर, ट्रिप मीटर, गिअर पोझिशन, फ्यूल गेज, सर्व्हिस इंडिकेटर, स्टँड अलर्ट आणि टाइम क्लॉक या अत्याधुनिक फीचर्सचा देखील यात समावेश आहे.

इतर स्पेसिफिकेशन

समोरच्या बाजूला शोवा 41 मिमी एसएफएफ-बीपी यूएसडी फोर्क्स आणि मागच्या बाजूला एडजेस्टेबल कंप्रेशर आणि रिबाऊंड डम्पिंग सस्पेंशन सेटअप चा वापर करण्यात आला आहे.

आणि याच्या ब्रेकिंग सेटअपमध्ये तुम्हाला रेडियल माउंट फोर-पिस्टन फ्रंट ब्रेक कॅलिपर सोबत 310mm फ्लोटिंग डिस्क ब्रेक देण्यात आले आहे.

दमदार इंजिन

या शानदार बाइकमध्ये 999cc, इनलाइन चार सिलिंडर DOHC 16V इंजिन वापरले आहे. हे इंजिन 147 बीएचपीपॉवर आणि 100 एनएम पीक टॉर्क जनरेट करते. थ्रॉटल बाय वायर (टीबीडब्ल्यू),

3 डिफॉल्ट राइडिंग मोड आणि होंडा सिलेक्टेबल टॉर्क कंट्रोल (एचएसटीसी) आणि असिस्ट/स्लीपर क्लच सारख्या सुविधा यात देण्यात आलेल्या आहेत.