Honda City : सेडान सेगमेंटमध्ये Honda City ची हवा ! 27 kmpl मायलेज आणि जबरदस्त फीचर्ससह किंमत आहे…


Honda City ला 1498 cc चे शक्तिशाली इंजिन आहे. जे रस्त्यावर 96.55 Bhp ची उच्च शक्ती निर्माण करते. या पॉवरफुल कारमध्ये ऑटोमॅटिक ट्रान्समिशनचा पर्यायही उपलब्ध आहे.

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Honda City : सध्या कार बाजारात अनेक कंपन्या शक्तिशाली कार लॉन्च करत आहे. या स्पर्धेत Honda City ही कार देखील मोठ्या प्रमाणात ग्राहकांना पसंत पडत आहे. याचे कारण म्हणजे कारचे मायलेज आणि फीचर्स हे आहे.

कारण सध्या देशात कार खरेदीदारांची स्थिती पाहता लोक जास्त मायलेज देणाऱ्या व प्रवासात पैशाची बचत करणाऱ्या कार खरेदी करत असतात. अशा वेळी जर तुम्हीही नवीन कार खरेदी करण्याचे प्लॅनिंग करत असाल तर तुमच्यासाठी Honda City हा चांगला पर्याय आहे. ही एक लक्झरी सेडान कार आहे.

कारमध्ये ऑटोमॅटिक ट्रांसमिशन पर्याय आहे

Honda City ला 1498 cc चे शक्तिशाली इंजिन आहे. जे रस्त्यावर 96.55 Bhp ची हाय शक्ती निर्माण करते. या पॉवरफुल कारमध्ये ऑटोमॅटिक ट्रान्समिशनचा पर्यायही उपलब्ध आहे आणि तिचे मायलेज 27.13 kmpl आहे. ही कंपनीची हाय परफॉर्मन्स कार आहे.

Honda City चे बाजारात V (न्यू) आणि ZX हे दोन व्हेरियंट उपलब्ध आहेत.

बाजारात या कारची सुरुवातीची किंमत 18.89 लाख रुपये ते 20.39 लाख रुपये एक्स-शोरूम आहे. होंडा सिटीच्या बाजारात V (न्यू) आणि ZX हे दोन प्रकार उपलब्ध आहेत. कंपनीने या कारमध्ये सहा सिंगल टोन कलर पर्याय दिले आहेत.

होंडा सिटीला e-CVT गिअरबॉक्स आहे

या कारमध्ये 1.5-लिटर पेट्रोल इंजिन 126 PS पॉवर आणि 253 Nm पीक टॉर्क निर्माण करते. होंडा सिटीला e-CVT गिअरबॉक्स मिळतो, ज्यामुळे ते उच्च प्रकारे काम करते. Honda City ला 8-इंचाची टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम मिळते. ही कंपनीची फॅमिली कार आहे जी तुमच्या परिवारासाठी उत्तम आहे.

सिंगल-पेन सनरूफ

या कारला सिंगल-पेन सनरूफ असल्यामुळे ही कार अधिक आकर्षक दिसते. या कारमध्ये Android Auto आणि Apple CarPlay सारखे फीचर्स मिळतात. होंडा सिटी सिंगल-पेन सनरूफ, अॅम्बियंट लाइटिंग, कनेक्टेड कार तंत्रज्ञान आणि मागील एसी व्हेंटसह ऑटोमॅटिक क्लाइमेट कंट्रोल यासारखे भन्नाट फीचर्स या कारमध्ये तुम्हालस पाहायला मिळतील. यासोबतच कारमध्ये कम्फर्ट सीट शेप देखील उपलब्ध आहे.

या कारमध्ये सहा एअरबॅग आणि इलेक्ट्रिक पार्किंग ब्रेक आहे

कंपनीने ही कार तयार करताना कारमध्ये पूर्ण सुरक्षिततेची काळजी घेतली आहे. यात सहा एअरबॅग्ज, इलेक्ट्रिक पार्किंग ब्रेक, अॅडव्हान्स ड्रायव्हिंग असिस्टंट सिस्टम (ADAS), ऑटोमॅटिक इमर्जन्सी ब्रेकिंग, क्रूझ कंट्रोल, हाय बीम असिस्ट आणि लेन किप असिस्ट यांसारखी वैशिष्ट्ये दिली आहेत. बाजाराबाबत विचार केला तर ही कार बाजारात मारुती ग्रँड विटारा आणि टोयोटा हायराईडरला टक्कर देते.