ऑटोमोबाईल

होंडाने आणली भन्नाट फीचर्स असलेली नवीन होंडा यूनिकॉर्न! मिळतील 3 कलर ऑप्शन, जाणून घ्या किंमत

Published by
Ajay Patil

New Honda Unicorn 2025:- भारतीय बाईक बाजारपेठ बघितली तर आपल्याला यामध्ये होंडा, हिरो तसेच बजाज व टीव्हीएस सारख्या कंपन्यांचे वर्चस्व दिसून येते व त्यातल्या त्यात होंडा कंपनी ही अग्रस्थानी आहे.

होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडिया या कंपनीने आतापर्यंत अनेक वेगवेगळ्या किमतीच्या आणि फीचर्स असलेल्या उत्तम अशा बाईक बाजारपेठेत आणल्या आहेत व ग्राहकांनी देखील आतापर्यंत या कंपनीच्या बाईक्सला उत्तम प्रकारे पसंती दिली आहे.

म्हणजेच ग्राहकांमध्ये होंडा कंपनीच्या सर्वच बाईक लोकप्रिय ठरलेल्या आहेत. यामध्ये या कंपनीचे बाईक्स बघितल्या तर होंडा यूनिकॉर्न ही बाईक अतिशय लोकप्रिय अशी बाईक असून तरुणांमध्ये देखील या बाईकची क्रेझ मोठ्या प्रमाणावर दिसून येते.

त्यामुळे आता होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडियाने होंडा यूनिकॉर्न 2025 बाजारात आणली असून आता कंपनीने या नवीन बाईकमध्ये अनेक नवनवीन फीचर्स आणि रायडर्सच्या गरजा लक्षात घेऊन ही नवीन बाईक तयार केली आहे.

विशेष म्हणजे कंपनीने या नव्या युनिकॉर्नला फक्त एका डिस्क व्हेरियंटसह मार्केटमध्ये आणले आहे. सध्या ही बाईक देशातील संपूर्ण होंडाच्या डीलरशिपवर विक्री करिता उपलब्ध आहे.

काय आहेत होंडा यूनिकॉर्न 2025 चे फीचर्स आणि इतर महत्वाची स्पेसिफिकेशन्स
ग्राहकांच्या ज्या काही नवीन मागण्या आहेत त्या पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून एक संयुक्त अशी कम्फर्ट स्टाईल व टेक्नॉलॉजीचा वापर करत कंपनीने होंडा यूनिकॉर्न 2025 बाजारात आणली असून यामध्ये कंपनीने क्रोम एलिमेंट व त्यासोबत नवीन ऑल एलईडी हेडलॅम्प कनेक्ट करण्यात आले आहेत व यामुळे या बाईकचे सिम्पल डिझाईन मेंटेन ठेवण्यात यश आले आहे.

तसेच या नवीन युनिकॉर्नला मेट एक्सेस ग्रे मेटॅलिक, पर्ल इग्निअस ब्लॅक आणि रेडियंट रेड मॅटेलिक यातील कलर ऑप्शन मध्ये सादर केली आहे. इतकेच नाही तर ही बाईक पूर्णपणे डिजिटल इन्स्ट्रुमेंट कन्सोलसह येते व सध्या गिअर पोझिशन इंडिकेटर,

ड्यू इंडिकेटर, इको इंडिकेटर आणि अशा अनेक महत्त्वाच्या माहिती दर्शवणाऱ्या गोष्टींचा यामध्ये समावेश करण्यात आला आहे. याशिवाय या बाईकमध्ये प्रवास करताना स्मार्टफोन चार्जिंग करता यावा याकरिता एक यूएसबी टाईप सी चार्जिंग पोर्ट दिलेला आहे.

कसे आहे या बाईकचे इंजिन?
कंपनीने या नवीन होंडा यूनिकॉर्नमध्ये 162.71 सीसी सिंगल सिलेंडर,फ्युएल इंजेक्टर इंजिन दिले आहे. तसेच या बाईकची मोटार ७५०० आरपीएम वर 13 बीएचपीची पावर आणि 5200 आरपीएम वर 14.58m चा पिक टॉर्क जनरेट करण्यासाठी सक्षम असून या इंजिनला पाच स्पीड गिअरबॉक्ससह कनेक्ट करण्यात आलेले आहे.

किती आहे नवीन होंडा यूनिकॉर्न 2025 ची किंमत?
होंडा मोटार सायकल अँड स्कूटर इंडियाने नवीन होंडा यूनिकॉर्न 2025 ला डिस्क व्हेरियंटसह मार्केटमध्ये आणले असून जिची किंमत एक लाख एकोणवीस हजार रुपये पासून सुरू होते. सध्या ही बाईक विक्रीकरिता देशातील होंडा डीलरशिप वर उपलब्ध आहे.

Ajay Patil