Electric Cars : वाहन उत्पादक कंपनी होंडाने आपल्या नवीन इलेक्ट्रिक कारवरून पडदा हटवला आहे. होंडाची नवी कार लवकरच ऑटोमोबाईल बाजारात पाहायला मिळणार आहे. नवीन Honda e:N2 चे अनावरण चीन येथे आयोजित चायना इंटरनॅशनल इम्पोर्ट एक्सपोमध्ये करण्यात आले आहे. यासोबतच त्याची संकल्पनाही समोर आली आहे. रिपोर्टनुसार, कंपनी येत्या 5 वर्षांत 10 इलेक्ट्रिक कार मार्केटमध्ये लॉन्च करू शकते.
फक्त एक वर्षापूर्वी, Honda ने HR-V आधारित e:NS 1 आणि e:NP1 बंद केले आणि आता Honda e:N2 ची संकल्पनाही समोर आली आहे. ही इलेक्ट्रिक कार अनेक उत्तमोत्तम फीचर्सने सज्ज असेल. कारच्या डिझाईनबद्दल बोलायचे झाले तर कारवर e:N डिझाइनचा प्रभाव आहे. कारची शार्प बॉडी तिला आकर्षक लूक देते.
ही कार इंटेलिजेंट सिस्टम कंट्रोल, इंटेलिजेंट आणि कार्यक्षम शुद्ध इलेक्ट्रिक आर्किटेक्चर आणि होंडा सेन्सिंग 360 सारख्या वैशिष्ट्यांनी सुसज्ज आहे. त्याचे सर्वात आश्चर्यकारक वैशिष्ट्य “Honda Sensing 360” आहे. या फीचरच्या माध्यमातून क्रॉसरोडवरून चालणाऱ्यांना सुरक्षितता मिळणार आहे. या फीचरमध्ये सेन्सर साइड अँगल रडारद्वारे पादचाऱ्यांपर्यंत पोहोचतो. नवीन इलेक्ट्रिक कारमध्ये आधुनिक बुद्धिमान तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे.
एवढेच नाही तर कारमध्ये ड्रायव्हिंग हेल्पिंग सिस्टीम, ब्लाइंड स्पॉट कोलिजन अलर्ट, लेन चेन वॉर्निंग, अॅडॅप्टिव्ह क्रूझ कंट्रोल आणि लेन कीप असिस्ट यांसारख्या वैशिष्ट्यांसह सुसज्ज आहे. Honda e:N2 ची किंमत आणि लॉन्च वेळ कंपनीने अद्याप उघड केलेली नाही. लवकरच होंडा याबाबत नवीन अपडेट देईल अशी अपेक्षा आहे. ही कार भारतात कधी लॉन्च केली जाईल, याची माहिती अद्याप समोर आलेली नाही.