Honda New Scooter : नजीकच्या भविष्यात स्कूटर खरेदी करणाऱ्यांसाठी एक गुड न्यूज आहे. जर तुम्हालाही नवीन स्कूटर खरेदी करायची असेल तर तुमच्यासाठी होंडा लवकरच एक नवीन स्कूटर लॉन्च करणार असल्याची बातमी समोर आली आहे. होंडा ही देशातील एक प्रमुख टू व्हीलर मेकर कंपनी आहे. या कंपनीच्या अनेक टुविलर ग्राहकांमध्ये लोकप्रिय आहेत. स्कूटर सेगमेंट मध्ये तर होंडा कंपनीचा मोठा बोलबाला आहे.
ज्या पद्धतीने इलेक्ट्रिक कार सेगमेंट मध्ये टाटा कंपनीला जोड नाही. त्याचप्रमाणे स्कूटर सेगमेंटमध्ये होंडा कंपनीला जोड नाहीये. होंडा कंपनीची एक्टिवा ही स्कूटर ग्राहकांमध्ये खूपच लोकप्रिय असून या स्कूटरचे आतापर्यंत लाखो युनिट सेल झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, एप्रिल 2024 मध्ये होंडा कंपनीने एक्टिवा चे जवळपास 2.60 लाख युनिट विकले होते.
अशातच आता स्कूटर सेगमेंट आणखी पावरफुल बनवण्यासाठी होंडा कंपनी बाजारात लवकरच एक नवीन स्कूटर लॉन्च करणार असल्याची बातमी समोर आली आहे. खरे तर स्कूटर सेगमेंटमध्ये कंपनी खूपच बलाढ्य आहे, यात शन्काच नाही.
मात्र असे असले तरी होंडा कंपनीकडे 160cc सेगमेंट मध्ये एकही स्कूटर नाहीये. यामुळे कंपनी लवकरच 160cc मध्ये एक नवीन स्कूटर लॉन्च करणार अशी खात्रीलायक बातमी समोर येत आहे. यामुळे भारतीय ग्राहकांना नजीकच्या भविष्यात 160 सीसी सेगमेंट मध्ये होंडा कंपनीच्या स्कूटरचा देखील ऑप्शन उपलब्ध होणार आहे.
Honda कोणती स्कूटर लॉन्च करणार?
कंपनी लवकरच स्टायलो 160 ही नवीन स्कूटर लॉन्च करणार असल्याचा दावा मीडिया रिपोर्ट मध्ये होत आहे. सध्या कंपनी ही स्कूटर इंडोनेशियाच्या मार्केटमध्ये विकत आहे. मात्र नजीकच्या काळात ही स्कूटर भारतीय मार्केटमध्ये देखील पाहायला मिळणार आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की सध्या भारतात 160 सीसी सेगमेंट मध्ये यामाहा कंपनीची यामाहा ऐरोएक्स 155 ही स्कूटर उपलब्ध आहे.
शिवाय हिरो कंपनी देखील या सेगमेंट मध्ये एक नवीन स्कूटर लॉन्च करणार आहे. दरम्यान आता 160 सीसी स्कूटर सेगमेंट मध्ये होंडा कंपनी स्टायलो 160 ही नवीन स्कूटर लॉन्च करणार आहे. अशा परिस्थितीत आज आपण या नव्याने लॉन्च होणाऱ्या स्कूटरचे डिझाईन अन फिचर्स कसे राहणार याविषयी थोडक्यात माहिती पाहणार आहोत.
कशी राहणार नवीन स्कूटरची डिझाईन?
स्टायलो 160 च्या डिझाईनबाबत बोलायचे झाल्यास या नवीन स्कूटरचे डिझाईन हे तरुणांना डोळ्यासमोर ठेवून केले जाणार आहे. तरुणांसहित महिला व इतर ग्राहकांना या स्कूटरचे डिझाईन आवडेल असे म्हटले जात आहे. यात गोल आकाराचा हेडलॅम्प, एक मोठा सिंगल-पीस सीट आणि स्लोपिंग वक्र डिझाइन लाइन्ससह मजबूत ग्रॅब रेल राहणार आहे.
या स्कूटरला संपूर्ण एलईडी लाइटिंग, डिजिटल कन्सोल, कीलेस स्टार्ट सिस्टम आणि एक मानक USB चार्जर देखील मिळणार आहे. सस्पेन्शनसाठी याच्या पुढच्या बाजूला टेलिस्कोपिक फोर्क्स आणि मागील बाजूस मोनोशॉक युनिट आहे. ब्रेकिंगसाठी दोन्ही टोकांना डिस्क ब्रेक प्रदान केले जातील असा दावा मीडिया रिपोर्ट मध्ये करण्यात आला आहे.
इंजिन आणि किंमत कशी राहणार ?
हाती आलेल्या माहितीनुसार, कंपनीच्या या अपकमिंग 160 सीसी सेगमेंटच्या स्कूटरमध्ये 156.9cc, सिंगल-सिलेंडर, लिक्विड-कूल्ड इंजिन उपलब्ध करून देण्याचा कंपनीचा प्रयत्न असेल. हे इंजिन 16bhp पॉवर आणि 15Nm टॉर्क जनरेट करू शकते, अशी माहिती समोर येत आहे. मायलेज बाबत बोलायचं झालं तर ही नव्याने लॉन्च होणारी स्कूटर 45 किलोमीटर प्रति लिटर पर्यंतचे मायलेज देण्यास सक्षम राहणार असा दावा होत आहे.
यात 12 इंची अलॉय व्हील्स दिले जाणार आहेत. रायडरच्या सुरक्षेसाठी सिंगल-चॅनल अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टम (ABS) देखील उपलब्ध राहणार आहेत. या स्कूटरचे वजन हे सुमारे 118 किलोग्रॅम पर्यंत राहू शकते. या स्कूटरची एक्स-शोरूम किंमत ही जवळपास 1.50 लाख रुपये राहणार असल्याचा दावा करण्यात आला आहे.