Honda Scooter : मजबूत सुरक्षा वैशिष्ट्ये आणि 55 Kmpl मायलेज! होंडाची ही स्कूटर घरी आणा फक्त 2000 रुपयांमध्ये…

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Honda Scooter : भारतातील ऑटो क्षेत्रामध्ये अनेक कंपन्यांच्या स्कूटर उपलब्ध आहेत. तुमचेही बजेट कमी आहे आणि नवीन स्कूटर खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी होंडाची स्कूटर बेस्ट ठरू शकते. कमी बजेटमध्ये तुम्ही होंडाची स्कूटर घरी आणू शकता.

होंडा कंपनीकडून त्यांची अलीकडेच एक नवीन स्कूटर सादर करण्यात आली आहे. Dio 125 असे या डॅशिंग स्कूटरचे नाव आहे. या स्कूटरमध्ये होंडाकडून अनेक धमाकेदार फीचर्स देण्यात आले आहेत.

कारसारखी स्मार्ट की, अगदी दोन मीटर अंतरावरूनही सुरू करा

होंडा Dio 125 स्कूटरमध्ये कंपनीकडून स्मार्ट की देण्यात आली आहे. कंपनीकडून देण्यात आलेल्या या स्मार्ट कीच्या मदतीने तुम्ही चावी न लावता स्कूटर चालू आणि बंद करू शकता. तसेच स्मार्ट कीच्या मदतीने तुम्ही स्कूटर लॉक आणि अनलॉक देखील करू शकता.

डिस्क ब्रेक रायडरला स्कूटरवर पूर्ण नियंत्रण देते

होंडा Dio 125 स्कूटरमध्ये डिस्क ब्रेक देण्यात आला आहे. त्यामुळे रायडरला स्कूटरवर नियंत्रण मिळवण्यास मदत होते. तसेच या स्कूटरला 171 mm ग्राउंड क्लीयरन्स देखील देण्यात आला आहे. त्यामुळे ती सहज तुम्ही कुठेही चालवू शकता.

स्कूटर 8.19 bhp पॉवर देते

होंडा कंपनीकडून त्यांच्या Dio 125 स्कूटरमध्ये क्रोम कव्हर, स्लीक पोझिशन लॅम्प आणि ड्युअल आउटलेट मफलर देण्यात आले आहे. तसेच स्कूटरमध्ये 123.97cc इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन 8.19 bhp पॉवर आणि 10.4 Nm पीक टॉर्क जनरेट करते.

Honda Dio 125 मध्ये वैशिष्ट्ये

अलॉय व्हील्स, ऑल-डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आणि शार्प हेडलॅम्प्स जबरदस्त लुकसह ही स्कूटर बाजारात उपलब्ध आहे. तसेच स्कूटरमध्ये 18-लिटर बूट स्पेस देखील देण्यात आले आहे. यामध्ये तुमचे सामान तुम्ही सहज ठेऊ शकता.

Dio 125 स्कूटर किंमत

होंडा कंपनीच्या अनेक स्कूटर सध्या भारतीय बाजारात अधिक लोकप्रिय आहेत. Dio 125 ही स्कूटर खरेदी करण्याचा प्लॅन असेल तर या स्कूटची एक्स शोरूम किंमत 83400 रुपये आहे आणि स्मार्ट मॉडेल स्कूटरची एक्स शोरूम किंमत 91,300 हजार रुपयांपर्यंत जाते.

तुम्ही फक्त 10,000 रुपये देऊन खरेदी करू शकता

जर तुमचे बजेट कमी असेल तर तुम्ही कमी बजेटमध्ये देखील ही स्कूटर घरी घेऊन जाऊ शकता. फक्त १० हजार रुपयांच्या डाउनपेमेंटवर तुम्ही ही स्कूटर खरेदी करू शकता. बाकीची रक्कम तुम्हाला 9.7 टक्के व्याजदराने तीन वर्षांसाठी फायनान्स कंपनीकडून कर्जाच्या स्वरूपात दिले जाईल. यासाठी तुम्हाला दरमहा 2,775 रुपये हफ्ता भरावा लागेल.