Honda Motors : पावसाळ्याचा महिना सुरू होताच, ऑटो निर्मात्या कंपन्यानी त्यांच्या वाहनांच्या किंमती कमी केल्या आहेत. या मालिकेत जपानी कार निर्माता कंपनी होंडानेही जबरदस्त मान्सून ऑफर आणली आहे. ज्या अंतर्गत कंपनीने या महिन्यात आपल्या नवीन ग्राहकांसाठी ठराविक कालमर्यादेसह ‘होंडा मॅजिकल मान्सून’ मोहीम सुरू केली आहे. ३१ जुलैपर्यंत चालणाऱ्या या ऑफर अंतर्गत ग्राहकांना अनेक वाहनांवर मोठी सूट दिली जाणार आहे. चला या ऑफरबद्दल सविस्तर जाणून घेऊया…
होंडाकडून जुलै महिन्यात सादर करण्यात येणाऱ्या ‘होंडा मॅजिकल मान्सून’ ऑफरमध्ये कंपनी ग्राहकांना अनेक उत्तम सुविधांचा लाभ देत आहे. हेज्या अंतर्गत, सर्व Honda मॉडेल्सच्या खरेदीवर, सर्व टेस्ट ड्राइव्हवर सरप्राईज गिफ्ट मिळण्याची संधी मिळेल, यासोबतच स्वित्झर्लंडची सहल किंवा 75,000 रुपयांपर्यंतची खात्रीशीर भेट मिळण्याचीही संधी आहे. .
होंडा कंपनीने आपल्या वाहनांच्या विक्रीला गती देण्यासाठी ऑफर केलेल्या या ऑफर अंतर्गत, ग्राहकांना होंडा एलिवेटच्या खरेदीवर 30 जुलैपर्यंत 55,000 ते 67,000 रुपयांपर्यंतच्या बचतीचा लाभ मिळत आहे. Honda ने भारतीय बाजारात Honda Elevate ला 11.91 लाख रुपयांच्या एक्स-शोरूम किमतीत लॉन्च केले आहे, Honda City या कारच्या प्रकारानुसार कंपनी 68,000 ते 89,000 पर्यंत सूट देत आहे. सिटी हायब्रिड मॉडेलवर मिळणाऱ्या सवलतीबद्दल बोलायचे झाले तर, या कारची सुरुवातीची किंमत 12.08 लाख रुपये आणि 20.55 लाख रुपये आहे.
या महिन्यात, कंपनी सरकारी योजने अंतर्गत अमेझमध्ये सीएनजी किट स्थापित करणाऱ्या ग्राहकांना 40,000 रुपयांच्या प्रतिपूर्ती रकमेचा लाभ देखील देत आहे. Amaze ची भारतीय बाजारपेठेत सुरुवातीची किंमत 7.92 लाख रुपये आहे. मासिक सवलत ऑफर अंतर्गत, होंडा अमेझ कारच्या खरेदीवर जुलैमध्ये 66,000 ते 1.04 लाख वाचवण्याची संधी आहे, जी मारुती डिझायर आणि ह्युंदाई ऑराला टक्कर देते.