ऑटोमोबाईल

1 लिटर पेट्रोल किंवा डिझेलमध्ये नवीन क्रेटा किती किलोमीटर धावणार ? समोर आली मोठी अपडेट

Published by
Ahmednagarlive24 Office

Hyundai New Creta Mileage : कार घेणाऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि कामाची बातमी आहे. खरे तर नुकत्याच काही दिवसांपूर्वी ह्युंदाई या लोकप्रिय कार निर्मात्या कंपनीने आपल्या एका लोकप्रिय मॉडेलचे फेसलिफ्ट वर्जन लॉन्च केले आहे.

क्रेटा या लोकप्रिय कारचे फेसलिफ्ट वर्जन कंपनीने नुकतेच लाँच केले आहे. ही गाडी लॉन्च झाल्यापासून विशेष चर्चेत आहे. या नवीन मॉडेल मध्ये कंपनीच्या माध्यमातून काही बदल करण्यात आले आहेत. मात्र या बदलांमुळे ही गाडी आधीच्या तुलनेत आणखी सुंदर बनली आहे.

फक्त डिझाईनच नाही तर या गाडीमध्ये असणारे सेफ्टी फीचर्स देखील कमाल आहेत. परिणामी अनेकांच्या माध्यमातून या गाडीविषयी विचारणा होत आहे. अनेकांची आता ही गाडी खरेदी करण्याची इच्छा आहे. दरम्यान जर तुम्हीही ह्युंदाई कंपनीची ही अलीकडे लाँच झालेली कार खरेदी करण्याच्या तयारीत असाल तर तुमच्यासाठी आजची ही बातमी खूपच खास राहणार आहे.

कारण की, आज आपण या अलीकडेच लॉन्च झालेली ह्युंदाई क्रेटा फेसलिफ्ट कार किती मायलेज देते याविषयी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. एक लिटर पेट्रोल किंवा डिझेलमध्ये ही गाडी किती किलोमीटर पर्यंत धावते याविषयी आता आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत. वास्तविक अनेकांना या गाडीच्या मायलेज विषयी जाणून घ्यायचे होते. अखेर कार या गाडीच्या मायलेजची सविस्तर डिटेल समोर आली आहे.

क्रेटा फेसलिफ्टचे इंजिन :- Hyundai Creta फेसलिफ्टमध्ये 1.5-liter MPi पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे, जें की 115PS पॉवर आणि 144Nm पार्क जनरेट करण्यासाठी. तसेच डिझेल इंजिन बाबत बोलायचं झालं तर 1.5-liter U2 CRDi डिझेल इंजिन उपलब्ध करून देण्यात आले असे जे की 116PS आणि 250Nm टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे.

1.4-लीटर कप्पा टर्बो GDi पेट्रोल युनिट काही काळासाठी बाहेर पडले आहे आणि नवीन 1.5-लीटर कप्पा टर्बो GDi पेट्रोल इंजिन (160PS आणि 253Nm) ने बदलले आहे. ट्रान्समिशन पर्यायांमध्ये 6-स्पीड एमटी आणि IVT ऑटोमॅटिकसह 1.5-लिटर MPi पेट्रोल इंजिन, 7-स्पीड DCT ऑटोमॅटिक ट्रान्समिशनसह 1.5-लीटर कप्पा टर्बो GDi पेट्रोल इंजिन आणि 6-स्पीड MT आणि 6-स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशनसह 1.5-लीटर U2 CRDi डिझेल इंजिन समाविष्ट आहे.

क्रेटा फेसलिफ्ट किती मायलेज देते :- मिळालेल्या माहितीनुसार मॅन्युअल ट्रान्समिशन क्रेटा पेट्रोल 17.4 किलोमीटर प्रति लिटर चे मायलेज येते. ऑटोमॅटिक ट्रान्समिशन क्रेटा पेट्रोल 17.7 किलोमीटर प्रति लिटर चे मायलेज देते. मॅन्युअल क्रेटा डिझेल 21.8 किलोमीटर प्रति लिटरचे मायलेज देते. ऑटोमॅटिक क्रेटा डिझेल 19.1 किलोमीटर प्रति लिटरचे मायलेज देते. ऑटोमॅटिक क्रेटा टर्बो पेट्रोल 18.4 किलोमीटर प्रति लिटरचे मायलेज देण्यास सक्षम आहे.

Ahmednagarlive24 Office