Maruti च्या ‘या’ सहा कारवर मिळतोय प्रचंड डिस्काउंट, जाणून घ्या सर्व डिटेल्स एका क्लिकवर

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Maruti car : मारुती कंपनीच्या कार जबरदस्त पसंत केल्या जात आहेत. मागील महिन्यात या कंपनीच्या कार्सने विक्रीमध्ये प्रचंड रेकॉर्ड केले. आता मारुती सुझुकी या फेस्टिव्हल सीझनमध्ये

आपल्या एरिना डीलरशिपवर विकल्या जाणाऱ्या वाहनांवर मोठी सूट देत आहे. मारुती सुझुकी या दिवाळीच्या मुहूर्तावर आपल्या 6 कार वर प्रचंड डिस्काउंट देत आहे. यात मारुतीच्या अत्यंत प्रसिद्ध कार्स चा समावेश आहे. चला त्याबद्दल जाणून घेऊयात –

Maruti Suzuki Alto K10

मारुती आपल्या सर्वात स्वस्त हॅचबॅक ऑटो k10 वर 49,000 रुपयांची मोठी सूट देत आहे. मारुती ऑल्टो के10 ची एक्स शोरूम किंमत 3.99 लाख ते 5.96 लाख रुपये दरम्यान आहे.

अल्टो k10 ही 4 व्हेरियंट आणि 6 कलर ऑप्शनमध्ये उपलब्ध आहे. यात 1.0 लीटर ड्युअल जेट पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे, जे 67 बीएचपी पॉवर आणि 89 एनएम टॉर्क जनरेट करते.

Wagon R

मारुती वॅगनआर ही भारतीय बाजारात सर्वाधिक विकली जाणारी एंट्री लेव्हल हॅचबॅक कार आहे. यावर कंपनी 49,000 रुपयांची सूट देत आहे. मारुती वॅगनआरची एक्स शोरूम किंमत 5.54 लाख ते 7.42 लाख रुपये दरम्यान आहे.

चार व्हेरियंटसह आठ कलर ऑप्शनमध्ये उपलब्ध आहे. गाडीची बूट स्पेस 341 लिटर आहे. यात 1.0 लीटर पेट्रोल इंजिन आहे जे 67 बीएचपी पॉवर आणि 89 एनएम टॉर्क जनरेट करते आणि 1.2 लीटर पेट्रोल इंजिन जे 90 बीएचपी पॉवर आणि 113 एनएम टॉर्क जनरेट करते.

Celerio

यंदाच्या दिवाळीत मारुती सेलेरियोवर 59,000 रुपयांची सूट दिली जात आहे. मारुती सेलेरियोची एक्स शोरूम किंमत 5.37 लाख ते 7.14 लाख रुपये दरम्यान आहे. सेलेरियो चार व्हेरियंट आणि 6 कलर ऑप्शनसह येते. यात 313 लीटरची मोठी बूट स्पेस आहे.

इंजिन पर्यायांमध्ये 1.0 लीटर पेट्रोल इंजिन आहे जे 67 बीएचपी पॉवर आणि 89 एनएम टॉर्क जनरेट करते. हे इंजिन 5-स्पीड मॅन्युअल आणि 5-स्पीड एमसी ट्रान्समिशनसह येते. सेलेरियो सीएनजी व्हर्जनमध्ये देखील उपलब्ध आहे, हे इंजिन 57 बीएचपी पॉवर आणि 82 एनएम टॉर्क जनरेट करते. सीएनजी व्हेरियंटमध्ये पाच स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन मिळते.

S presso

मारुती सुझुकी एस-प्रेसो वर या धनत्रयोदशीला 54,000 रुपयांची सूट देत आहे. मारुती सुझुकी एस-प्रेसोची एक्स शोरूम किंमत 4.26 लाख ते 6.12 लाख रुपये दरम्यान आहे. S presso एकूण चार प्रकार आणि सहा कलर ऑप्शन मध्ये येते.

यात 1.0 लीटर पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे, जे 68 बीएचपी पॉवर आणि 90 एनएम टॉर्क जनरेट करते. हे सीएनजी व्हर्जनमध्ये देखील देण्यात आले आहे.

Maruti Alto 800

मारुती सुझुकी Alto 800 च्या जुन्या स्टॉकवर 15,000 रुपयांची सूट कंपणी देत आहे. सध्या Alto 800 भारतीय बाजारपेठेतून बंद करण्यात आली आहे. यात Altoसाठी एक्सचेंज बोनस आणि सीएनजी व्हेरियंटचा समावेश आहे.

ऑटो 800 ची किंमत 3.54 लाख ते 5.13 लाख रुपये (एक्स-शोरूम दिल्ली) दरम्यान होती. पण कमी विक्री आणि भारत सरकारच्या नव्या नियमांमुळे त्या भारतीय बाजारातून बंद करण्यात आल्या आहेत.

Eco

यंदाच्या दिवाळीत मारुती आपल्या सर्वात स्वस्त 7 सीटर Eco कारवर 29,000 रुपयांची सूट देत आहे. मारुती सुझुकी इकोवरील सूटमध्ये सीएनजी व्हेरियंटचा समावेश आहे. मात्र, सीएनजीवर कॅश डिस्काउंट केवळ 5,000 रुपये असून यात कॉर्पोरेट सूट नाही.

मारुती सुझुकी इकोची एक्स शोरूम किंमत 5.27 लाख ते 6.53 लाख रुपये दरम्यान आहे. ईकोमध्ये 1.2 लीटर पेट्रोल इंजिन आहे जे 81 बीएचपी पॉवर आणि 104.4 एनएम टॉर्क जनरेट करते. हे इंजिन केवळ पाच स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशनसोबत येते.