Hyundai Tucson : ह्युंदाई ‘या’ कारवर देत आहे 2 लाख रुपयांची सूट, ऑफर 31 तारखेपर्यंत…

Content Team
Published:
Hyundai Tucson

Hyundai Tucson : जर तुम्ही या महिन्यात गाडी घेण्याचा विचार करत असाल तर आम्ही तुम्हाला अशा एका वाहनाबद्दल सांगणार आहोत, ज्यावर तुम्हाला 2 लाख रुपयांपर्यंत सूट मिळत आहे. आम्ही Hyundai कंपनीच्या टक्सन एसयूव्हीबद्दल बोलत आहोत. कपंनी सध्या या वाहनावर मोठी सूट ऑफर करत आहे.

कपंनीने जुलैमध्ये त्यांच्या कारवर उपलब्ध असलेल्या डिस्काउंटची यादी जाहीर केली आहे. कंपनी या महिन्यात ज्या गाड्यांवर सर्वाधिक सूट देत आहे त्यात त्यांची लक्झरी टक्सन एसयूव्ही आहे. कंपनी या SUV वर 2 लाख रुपयांची रोख सूट देत आहे.

कंपनी या कारच्या मॉडेल वर्ष 2023 आणि मॉडेल वर्ष 2024 वर वेगवेगळ्या सूट देत आहे. अशा परिस्थितीत टक्सन खरेदीसाठी हा महिना उत्तम ठरू शकतो. कंपनी Tucson च्या डिझेल आणि पेट्रोल या दोन्ही मॉडेल्सवर सूट देत आहे.

कंपनी टक्सन मॉडेल वर्ष 2023 च्या पेट्रोल मॉडेलवर 50,000 रुपये आणि डिझेल मॉडेलवर 2,00,000 रुपये रोख सूट देत आहे. त्याचप्रमाणे, ते मॉडेल वर्ष 2024 च्या पेट्रोल मॉडेलवर 25,000 रुपये आणि डिझेल मॉडेल्सवर 50,000 रुपये रोख सूट देत आहे. Hyundai एप्रिलमध्येही ग्राहकांना अशीच सूट देत होती. फरक एवढाच होता की MY24 च्या पेट्रोल मॉडेलवर 50,000 रुपयांची सूट मिळत होती. Tucson ची एक्स-शोरूम किंमत 29,01,800 रुपये आहे.

Hyundai Tucson वैशिष्ट्ये

Tucson ला 10.25-इंच ड्रायव्हर इन्स्ट्रुमेंट क्लस्टर डिस्प्ले आणि इंफोटेनमेंट सिस्टमसाठी 10.25-इंच टचस्क्रीन युनिट मिळते. याशिवाय, एसयूव्हीमध्ये पॅनोरामिक सनरूफ, रिमोट ऑपरेशनसह कनेक्टेड कार तंत्रज्ञान आणि ड्युअल झोन क्लायमेट कंट्रोल फीचर आहे. पॉवर, गरम आणि हवेशीर फ्रंट सीट आणि वायरलेस फोन चार्जिंग यांसारखी वैशिष्ट्ये देखील यामध्ये देण्यात आली आहेत. सुरक्षिततेसाठी, यात 6 एअरबॅग्ज, 360 डिग्री कॅमेरा, हिल होल्ड/डिसेंट कंट्रोल, ऑल-व्हील डिस्क ब्रेक्स आणि ADAS आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe