Car खरेदी करायची असेल तर पैसे तयार ठेवा ! ह्युंदाई कंपनी भारतीय मार्केटमध्ये लवकरच लॉन्च करणार ‘ही’ कार; फिचर्स अन किंमत किती ?

Tejas B Shelar
Published:

Hyundai Upcoming Car : नवीन कार खरेदी करू इच्छिणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. विशेषत ज्यांना ह्युंदाई कंपनीची गाडी खरेदी करायची असेल त्यांच्यासाठी ही बातमी खास राहणार आहे. खरे तर भारतात ह्युंदाई ही दुसऱ्या क्रमांकाची सर्वाधिक कार विक्री करणारी कंपनी आहे. मारुती सुझुकी ही भारतातील सर्वाधिक कार विक्री करणारी कंपनी आहे. मारुती सुझुकी नंतर ह्युंदाईचा नंबर लागतो.

दरम्यान हीच Hyundai आता भारतात एक नवीन कार लॉन्च करण्याच्या तयारीत असल्याची खात्रीलायक बातमी समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार येत्या एक ते दीड वर्षाच्या कालावधीत कंपनीच्या माध्यमातून भारतात अनेक नवीन मॉडेल्स लॉन्च केले जाणार आहेत.

विशेष म्हणजे काही गाड्यांचे फेसलिफ्ट वर्जन देखील येत्या काही महिन्यांनी भारतीय कार बाजारात दाखल होणार आहे. Alcazar ह्या लोकप्रिय एसयुव्ही कारचे फेसलिफ्ट वर्जन देखील लवकरच भारतीय कार बाजारात दाखल होणार आहे.

Hyundai Alcazar Facelift ची चाचणी युद्ध पातळीवर सुरू आहे. भारतीय रस्त्यावर अनेक वेळा ही गाडी चाचणी करताना दिसली आहे. यावरून असा अंदाज बांधला जात आहे की कंपनीची ही Hyundai Alcazar फेसलिफ्ट या फेस्टिव्ह सीझनमध्ये लॉन्च केली जाऊ शकते.

म्हणजेच ही गाडी दिवाळीच्या आधीच भारतीय कार मार्केटमध्ये पाहायला मिळणार आहे. अशा परिस्थितीत आज आपण या अपकमिंग एस यु व्ही गाडीचे फीचर्स नेमके कसे आहेत या संदर्भात थोडक्यात माहिती पाहणार आहोत.

कसे असतील फिचर्स ?

Hyundai Alcazar फेसलिफ्टची डिझाईन एकदम प्रीमियम राहणार आहे. ही आगामी फेसलिफ्ट कार 6 आणि 7 सीटरमध्ये नवीनतम संवेदनशील स्पोर्टिनेस डिझाइनसह बाजारात लॉन्च केली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.

याव्यतिरिक्त, नवीन अल्काझारमध्ये नवीन डिझाइन केलेले स्वर्ल-टाईप अलॉय व्हील आणि एलईडी डेटाइम रनिंग लाइट्स आणि हेडलॅम्प्ससह फ्रेश ग्रिल दिले जाणार आहेत. नवीनतम स्पाय शॉट्स क्रिज आणि स्किड प्लेटसह साइड प्रोफाइल दाखवत आहेत.

याशिवाय, या आगामी मॉडेलमध्ये पुढचे आणि मागील बंपर तसेच कनेक्ट केलेले LED टेल लॅम्प देखील राहणार आहेत. यामुळे या गाडीचा लुक हा खूपच आकर्षक राहील असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

या आगामी SUV च्या केबिनमध्ये, तुम्हाला वायरलेस Apple CarPlay आणि Android Auto कनेक्टिव्हिटीसह 10.25-इंच टचस्क्रीन डिस्प्ले, 10.25-इंच डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आणि हवेशीर फ्रंट सीट्स पाहायला मिळणार आहेत. तसेच या SUV मध्ये लेव्हल-2 ADAS, 360 डिग्री कॅमेरा सिस्टम, ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल आणि पॅनोरमिक सनरूफ देखील दिले जाणार आहेत.

पण पावर ट्रेनमध्ये म्हणजेच इंजिनमध्ये फारसा बदल होणार नाही. किमती बाबत बोलायचं झालं तर सध्याच्या मॉडेल पेक्षा आगामी फेसलिफ्ट मॉडेलची किंमत ही थोडीशी अधिक राहणार आहे. पण नेमकी किंमत किती राहणार हे जाणून घेण्यासाठी आणखी काही काळ वाट पाहावी लागणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe