Hyundai Upcoming Car : ह्युंदाई ‘या’ दिवशी लॉन्च करणार आणखी एक शानदार 7 सीटर कार! जाणून घ्या फीचर्स आणि किंमत

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Hyundai Upcoming Car : ह्युंदाई कार निर्मात्या कंपनीकडून त्यांची आणखी एक शानदार कार लवकरच भारतीय ऑटो क्षेत्रामध्ये लॉन्च केली जाणार आहे. ह्युंदाईच्या Exter या मिड सेगमेंट एसयूव्ही कारला ग्राहकांचा जोरदार प्रतिसाद मिळाल्यानंतर आता ह्युंदाई आणखी एक कार सादर करणार आहे.

कार निर्माता कंपनी ह्युंदाईकडून त्यांची आगामी Hyundai Santa Fe ही कार 10 ऑगस्ट रोजी लॉन्च केली जाणार आहे. या कारमध्ये कंपनीकडून प्रीमियम फीचर्स दिले जाणार आहेत. तसेच ही कार एक्स्टरपेक्षा खूप वेगळी असणार आहे.

Hyundai Santa Fe एक्स-शोरूम किंमत

ह्युंदाई कंपनीकडून त्यांच्या आगामी कारबाबत माहिती उघड केली नसली तरी त्याबाबत काही माहिती लीक झाली आहे. ह्युंदाई कंपनीची ही जुनी कार आहे. मात्र कंपनीकडून आता ती पुन्हा एकदा नवीन रूपात सादर केली जाणार आहे.

ह्युंदाई कंपनीकडून त्यांची Santa Fe कार गेल्या काही दिवसांपूर्वी बंद करण्यात आली होती. त्यावेळी या कारची सुरुवातीची एक्स शोरूम किंमत 28.32 लाख रुपये आणि टॉप मॉडेलची एक्स शोरूम किंमत 31.74 लाख रुपये होती.

2.5 लीटर इंजिनसह 7 सीटर कार

ह्युंदाईच्या आगामी Santa Fe या कारमध्ये कंपनीकडून मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशन दिले जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तसेच ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी या कारमध्ये अनेक रंग पर्याय दिले जाऊ शकतात. तसेच कारमध्ये कंपनीकडून एक मोठी टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम आणि ट्यूबलेस टायर्स ग्राहकांना ऑफर केले जाऊ शकतात.

मोठ्या अलॉय व्हील्स आणि प्रगत वैशिष्ट्ये

१० ऑगस्ट रोजी ह्युंदाईकडून आगामी Santa Fe या ७ सीटर कारचे अनावरण केले जाणार आहे. तसेच या दिवशी कंपनीकडून कारची डिलिव्हरी आणि इतर माहिती उघड केली जाईल. या कारमध्ये 21 इंची अलॉय व्हील दिले जाऊ शकतात. कारमध्ये एअरबॅग्ज, रियर पार्किंग सेन्सर्स, 360 कॅमेरा यांसारखी अशी प्रगत वैशिष्ट्ये दिली जाऊ शकतात.

Santa Fe ही कार बंद कारण्यावेळी पॉवरट्रेन किती होती

ह्युंदाई कंपनीकडून ज्यावेळी त्यांची Santa Fe ही कार बंद करण्यात आली तेव्हा या कारमध्ये 2199 cc डिझेल इंजिन देण्यात येत होते. हे इंजिन 194.3 Bhp चा उच्च पॉवर देण्यास सक्षम होते.

तसेच कारमध्ये 4 व्हील ड्राइव्हचा पर्याय देखील होता. त्यावेळी ही कार 14.74 kmpl पर्यंत मायलेज देत होती. आगामी कारमध्ये क्रूझ कंट्रोल आणि क्लायमेट कंट्रोल सारखी वैशिष्ट्ये देण्यात येण्याची शक्यता आहे. तसेच टर्बो इंजिनचा पर्यायही असेल.