Hyundai Upcoming Car : 6 एअरबॅग्ज आणि 40 पेक्षा जास्त सेफ्टी फीचर्ससह 10 जुलैला लॉन्च होतेय ‘ही’ स्वस्त एसयूव्ही, जाणून घ्या डिटेल्स

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Hyundai Upcoming Car : जर तुम्ही कमी किमतीत एसयूव्ही खरेदी करू इच्छित असाल तर जरा थांबा. कारण भारतीय बाजारात लवकरच ह्युंदायची आगामी एसयूव्ही लाँच केली जाणार आहे. जी तुम्ही खूप स्वस्तात खरेदी करू शकता. येत्या 10 जुलै रोजी ही कार लाँच केली जाणार आहे.

जी तुम्हाला 40 पेक्षा जास्त सेफ्टी फीचर्ससह खरेदी करता येणार आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे यात स्मार्ट सनरूफ आणि 6 एअरबॅग्ज दिले जाणार आहेत. जर तुम्ही सर्वोत्तम कार खरेदी करू इच्छित असाल तर तुमच्यासाठी हा उत्तम पर्याय आहे.

मिळणार ही भन्नाट फीचर्स

कंपनीच्या मतानुसार, Exeter मध्ये ऑफर करण्यात आलेले सनरूफ आवाज-सक्षम आहे आणि ‘ओपन सनरूफ’ किंवा ‘मला आकाश पाहायचे आहे’ सारख्या आदेशांना त्वरित प्रतिसाद देईल. तसेच यात फुल एचडी व्हिडिओ रिझोल्यूशनसह येणाऱ्या डॅशकॅममध्ये फ्रंट आणि रियर कॅमेरे, 2.31-इंचाचा एलसीडी डिस्प्ले, स्मार्टफोन अॅप-आधारित कनेक्टिव्हिटी आणि मल्टिपल रेकॉर्डिंग मोड प्रदान केले आहेत.

जे कारच्या पुढील आणि मागील दोन्ही बाजूंच्या स्थितीवर लक्ष ठेवतील. कंपनीची ही कार एकूण पाच प्रकारांमध्ये सादर करण्यात येणार आहे, ज्यात EX, S, SX, SX(O) आणि SX(O) Connect हे टॉप मॉडेल म्हणून समावेश आहेत. तसेच काही कनेक्टेड कार फीचर्स त्याच्या टॉप व्हेरियंटमध्ये दिसणार आहेत. बाजारात आल्यानंतर ही एसयूव्ही प्रामुख्याने टाटा पंच, रेनॉल्ट किगर, निसान मॅग्नाइट या मॉडेल्सला टक्कर देईल.

बुकिंग

सध्या Exter micro SUV साठी बुकिंग मोठ्या प्रमाणात सुरू आहे आणि डीलर्सने कळवले आहे की एक्स्टरचे पहिले युनिट जुलैच्या तिसऱ्या किंवा चौथ्या आठवड्यात ग्राहकांपर्यंत पोहोच केले जाणार आहेत. रिपोर्ट्सनुसार, अनेकांकडून ऑटोमॅटिक ट्रान्समिशन व्हेरियंटची निवड करण्यात आली आहे. तसेच, हे शक्य आहे की किंमतींच्या घोषणेनंतर, बुकिंग आणि व्हेरिएंटच्या विभाजनात बदल होईल. कारण, अनेकजण किमतींनंतरच त्यांच्या बजेटनुसार व्हेरिएंट फायनल करत असतात.

इंजिन आणि पॉवर

या कारमध्ये कंपनी 1.2-लीटर काप्पा पेट्रोल इंजिन वापरत असून जे तुम्ही Grand i10 Nios, i20 आणि Venue सारख्या मॉडेल्समध्ये पाहिले आहे. जरी याच्या पॉवर आउटपुटबद्दल कोणतीही माहिती दिली नसली तरी असे मानले जाते की ते 83hp पॉवर आणि 114Nm टॉर्क जनरेट करू शकते. ही एसयूव्ही कंपनी फिटेड सीएनजी व्हेरियंटमध्येही दिली जाणार आहे. हे इंजिन 5-स्पीड मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक गिअरबॉक्सशी जोडण्यात आले आहे.

सेफ्टी फीचर्स

Hyundai Exter मध्ये 40 पेक्षा जास्त सेफ्टी फीचर्सचा समावेश केला जाणार असल्याचा कंपनीचा दावा आहे. तसेच असे देखील सांगितले जात आहे की यापैकी 26 सेफ्टी फीचर्स अशी असणार आहेत की कंपनी त्यांना सर्व प्रकारांमध्ये देऊ शकते. कंपनी आपली आगामी एसयूव्ही एका नवीन रंगात सादर करत असून ज्याला कंपनीकडून ‘रेंजर खाकी’ असे नाव देण्यात आली आहे. ही पेंट स्कीम भारतात प्रथमच Exter सह सादर करण्यात येत आहे.