New Hyundai SUV : देशात नवनवीन कार लॉन्च होत आहेत. अशातच Tata Motors च्या Tata Punch या छोट्या SUV ला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे.
मात्र, लवकरच टाटा पंचसाठी अडचणी वाढणार आहेत. दक्षिण कोरियाची कार निर्माता कंपनी Hyundai भारतात मायक्रो SUV लाँच करू शकते. ही छोटी SUV कंपनीच्या Grand i10 च्या प्लॅटफॉर्मवर आधारित असेल. रिपोर्टनुसार या वाहनाचे लाँचिंग पुढील वर्षी केले जाऊ शकते.
नवीन मायक्रो एसयूव्हीला Ai3 कोड नाव देण्यात आले आहे. एक कॉम्पॅक्ट युटिलिटी व्हेईकल (CUV) असेल, जे प्रामुख्याने ग्राहकांसाठी असेल ज्यांना परवडणाऱ्या किमतीत SUV सारखा लुक हवा आहे. मस्क्युलर स्टाइलिंग आणि पुरेसा ग्राउंड क्लीयरन्स ही या मायक्रो एसयूव्हीची दोन प्रमुख वैशिष्ट्ये असतील.
कंपनीची सर्वात स्वस्त SUV
कंपनीची ही कार भारतातील Hyundai ची सर्वात स्वस्त SUV असेल. यात 1.2 लीटर पेट्रोल इंजिन दिले जाऊ शकते, जे आधीपासून Grand i10 NIOS आणि Aura मध्ये उपलब्ध आहे. हे इंजिन 83PS पॉवर आणि 114Nm टॉर्क जनरेट करते.
हे जागतिक बाजारपेठेत विकल्या जाणाऱ्या कंपनीच्या Hyundai Casper सारखे असू शकते. Hyundai Casper ची लांबी 3,595mm, रुंदी 1,595mm आणि उंची 1,575mm आहे आणि तिचा व्हीलबेस 2.4 मीटर आहे. वैशिष्ट्यांबद्दल बोलायचे झाल्यास, Hyundai Casper मध्ये डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, बिग टचस्क्रीन, सात एअरबॅग्ज आणि ADAS सारखी वैशिष्ट्ये आहेत.