Hyundai New Car : नवीन कार खरेदी करू इच्छिणाऱ्यांसाठी एक अतिशय मोठी आणि आनंदाची बातमी समोर येत आहे. जर तुम्हालाही नजीकच्या भविष्यात नवीन एसयुव्ही कार खरेदी करायची असेल तर ही बातमी तुमच्यासाठी खूपच महत्वाची ठरणार आहे. कारण की ह्युंदाई या लोकप्रिय कंपनीने भारतात एक नवीन एसयुव्ही लॉन्च करण्याची तयारी सुरू केली आहे.
मीडिया रिपोर्टनुसार ह्युंदाई कंपनी आपल्या लोकप्रिय SUV Alcazar चे फेसलिफ्टेड व्हर्जन बाजारात आणणार आहे. खरे तर मारुती सुझुकी नंतर भारतातील दुसरी सर्वात मोठी कार विकणारी कंपनी म्हणून Hyundai कंपनीचा गौरव केला जातो. दरम्यान ही कंपनी लवकरच SUV Alcazar चे फेसलिफ्ट वर्जन लाँच करणार असा दावा काही मीडिया रिपोर्ट मध्ये करण्यात आला आहे.
जसं की आपणास ठाऊकच आहे की, कंपनीने त्याची सर्वाधिक विकली जाणारी क्रेटा कारचे अपडेटेड वर्जन मागील महिन्यातच बाजारात लॉन्च केले आहे. अशातच आता अल्काझार फेसलिफ्ट जून 2024 पर्यंत भारतीय बाजारात विक्रीसाठी उपलब्ध होऊ शकते असे म्हटले जात आहे. अशा परिस्थितीत आज आपण या नव्याने बाजारात लॉन्च होणाऱ्या ह्युंदाई कंपनीच्या एसयूव्ही बाबत महत्वाची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
कसे राहणार Hyundai Alcazar चे फेसलिफ्ट वर्जन
Alcazar फेसलिफ्टमध्ये काही अत्यावश्यक बदल केले जाणार आहेत. पुढील बंपर आणि ग्रिल, हेडलॅम्प आणि डेटाइम रनिंग लॅम्प सिग्नेचर, अलॉय व्हील्स आणि मागील टेल-लाइट डिझाइनमध्ये कंपनीकडून महत्त्वाचे बदल केले जातील असा दावा एका मीडिया रिपोर्ट मध्ये करण्यात आला आहे. पण या नव्याने लॉन्च होणाऱ्या गाडीचे इंजिन आधीच्या गाडीमध्ये जसे होते तसेच राहणार आहे.
मात्र या फेसलिफ्टमध्ये 10.25-इंच स्क्रीन, ADAS सूट, ड्युअल-झोन क्लायमेट कंट्रोल, पॅनोरामिक सनरूफ आणि हवेशीर आसनांचा समावेश राहणार आहे. सोबतच, आगामी एसयूव्हीच्या अपहोल्स्ट्री आणि इंटीरियर शेड्समध्ये काही बदल होऊ शकतात. पण, या आगामी SUV ची किंमत किती राहणार याबाबत देखील अजून कोणतीच माहिती समोर आलेली नाही.
मात्र ही कार बाजारात लॉन्च होण्यापूर्वीच याची किंमत समोर येईल अशी आशा व्यक्त होत आहे. एकंदरीत ज्या ग्राहकांना ह्युंदाई कंपनीची एसयूव्ही खरेदी करायची असेल त्यांच्यासाठी ही बातमी निश्चितच कामाची ठरणार आहे. ग्राहकांना आता बाजारात SUV कार खरेदीसाठी आणखी काही विकल्प उपलब्ध होणार आहेत.