Hyundai 5 Seater Car : भारतात मध्यमवर्गीयांची संख्या खूप अधिक आहे. दरम्यान मध्यमवर्गीय लोकांना फाईव्ह सीटर किंवा सेवन सीटर कार हवी असते. मात्र मध्यमवर्गीय स्वस्तात अशी कार खरेदी करण्याचे स्वप्न पाहतात.
शिवाय या लोकांना अधिक मायलेज देणारी कार हवी असते. दरम्यान, जर तुम्हीही अधिक मायलेज देणारी फाईव्ह सीटरकार शोधत असाल तर तुमच्यासाठी आजची बातमी खूपच खास राहणार आहे. कारण की आज आपण ह्युंदाई कंपनीची अशा एका कारची माहिती जाणून घेणार आहोत
जी फाईव्ह सीटर तर आहेच सोबत अधिक मायलेज देते. विशेष बाब अशी की या कारची किंमत देखील मध्यमवर्गीयांच्या आवाक्यातील आहे. चला तर मग वेळ न दवडता जाणून घेऊया या 5 सीटर बजेट कार संदर्भात सविस्तर माहिती.
कोणती आहे ती कार
आम्ही ज्या कारबाबत बोलत आहोत ती आहे ह्युंदाई कंपनीची Exter कार. या गाडीला नुकताच कार ऑफ द इयर हा पुरस्कार मिळाला आहे. त्यामुळे ही गाडी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.
जर तुम्हालाही फाईव्ह सीटर बजेट कार हवी असेल तर ही कार तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. विशेष म्हणजे या कारचे मायलेज देखील खूपच चांगले आहे. यामुळे तुम्हाला या कारने कमी प्रवास खर्चात प्रवास करता येणार आहे.
कारची किंमत किती आहे
Hyundai Exter ही कंपनीची एक बेस्ट सेलिंग कार आहे. या कारसाठी मात्र मोठी वेटिंग लिस्ट असते. एका मुंबई आणि पुण्यासारख्या शहरात बुक केल्यानंतर तीन ते साडेतीन महिन्यात मिळते. या कारच्या बेस मॉडेलची एक्स-शोरूम किंमत 6.90 लाख रुपये एवढी आहे. तथापि, या गाडीच्या टॉप मॉडेलची एक्स शोरूम किंमत 11.87 लाख रुपये एवढी आहे. ही कार सीएनजी वेरियंट मध्ये देखील येते. CNG मध्ये ही कार दोन प्रकारात येते. CNG बेस व्हेरिएंटची एक्स-शोरूम किंमत 9.54 लाख रुपये एवढी ठेवण्यात आली आहे.
कारमध्ये आहेत भन्नाट फिचर्स आणि दमदार इंजिन
या कारमध्ये ऑटोमॅटिक आणि मॅन्युअल असे दोन्ही प्रकारचे ट्रान्समिशन उपलब्ध आहेत. दोन्ही प्रकारच्या ट्रान्समिशनची किंमत मात्र भिन्न आहे. कंपनीकडून या कारचे एकूण चार प्रकार उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
दरम्यान कारच्या या विविध व्हेरियंटचे मायलेज देखील वेगवेगळे आहे. व्हेरिएंटनुसार ही कार 19.2 ते 27.1 चे मायलेज देण्यास सक्षम असल्याचा दावा कंपनीने केला आहे. या कारमध्ये 1.2 लीटर पेट्रोल इंजिन देण्यात आले येते.
या कारमध्ये चार सिलिंडर इंजिन देण्यात आले आहेत जे की हाय पॉवर जनरेट करण्यासाठी सक्षम आहे. या कारमध्ये स्प्लिट हेडलॅम्प आहेत, त्याच्या मागील बाजूस एसी व्हेंट्स आहेत. ही कार एलईडी लाइट्ससह ऑफर केली जात आहे.
कारमध्ये डॅशकॅम, वायरलेस चार्जर आणि सनरूफ सारखे हाय रेटिंग फीचर्स आहेत. या फीचर्स मुळे ही कार तरुणाईला वेड लावत आहे. यात पिलर माउंटेड ORVM देण्यात आले आहेत. एक्स्टर ही कॉम्पॅक्ट एसयूव्ही सेगमेंटमधील एक कार आहे,
ज्यामध्ये अतिशय स्टाइलिश फ्रंट ग्रिल देण्यात आले आहेत. एकंदरीत ही कार कमी किमतीत उत्कृष्ट फीचर्स ऑफर करत आहे. हेच कारण आहे की ही कार खरेदी करण्यासाठी अनेकजण अक्षरशः वेडे झाले आहेत. ही गाडी अल्पावधीतच कार प्रेमींमध्ये लोकप्रिय बनली आहे.