ऑटोमोबाईल

कार घेताय मग पैसा तयार ठेवा ! जानेवारी 2024 मध्ये लॉन्च होणार ‘या’ 2 नवीन कार, वाचा याच्या विशेषता

Published by
Ahmednagarlive24 Office

2024 Upcoming Car : कार घेणाऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाचे आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. खरे तर नवीन वर्ष सुरू होण्यास आता अवघ्या काही तासांचा काळ बाकी आहे. दरम्यान येत्या नवीन वर्षात अनेक जण नवीन वाहन खरेदी करणार आहे. वर्ष 2023 कार बाजारासाठी खूपच फायदेशीर ठरले आहे. आशा आहे की 2024 हे नवीन वर्ष देखील असेच फायदेशीर ठरेल.

अशातच आता नवीन वर्षात अनेक दिग्गज ऑटो कंपन्या नवीन कार लॉन्च करणार असे वृत्त हाती आले आहे. नवं वर्षाच्या अगदी सुरुवातीला अर्थात जानेवारी 2024 मध्ये देशातील नामांकित कार निर्मात्या कंपन्या काही नवीन कार लॉन्च करण्याच्या तयारीत आहेत. यामध्ये ह्युंदाई आणि Kia या दोन कंपन्यांचा देखील समावेश होतो.

या दोन्ही नामांकित कंपन्या नववर्षाच्या अगदी सुरुवातीलाच Car लॉन्च करणार आहेत. दरम्यान आज आपण या कंपन्या कोणती कार लॉन्च करण्याच्या तयारीत आहेत आणि या कारचे फीचर्स काय राहतील याविषयी थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

Hyundai : ह्युंदाई ही एक प्रमुख कार निर्माती कंपनी आहे. या कंपनीच्या अनेक गाड्या लोकप्रिय आहेत. Creta ही देखील कंपनीची अशीच एक लोकप्रिय कार आहे. ही कार भारतातील सर्वाधिक विकली जाणारी कार म्हणून ओळखली जाते. दरम्यान कंपनी या कारचे अपडेटेड व्हर्जन नवीन वर्षात लॉन्च करणार आहे.

16 जानेवारी रोजी कंपनी क्रेटा कारची फेसलिफ्ट आवृत्ती लॉन्च करणार अशी बातमी समोर आली आहे. ही अपडेटेड Hyundai Creta बाजारात मारुती सुझुकी Grand Vitara, MG Hector, Tata Harrier आणि Skoda Kushaq यांच्याशी स्पर्धा करणार असल्याचे बोलले जात आहे.

Hyundai च्या आगामी Creta फेसलिफ्ट कारमध्ये मात्र अनेक महत्त्वाचे बदल केले जाणार आहेत. या नव्याने बाजारात येणाऱ्या कारच्या आतील आणि बाहेरील भागात मोठे बदल दिसून येतील असा दावा करण्यात आला आहे. ही कार अॅडव्हान्स ड्रायव्हर असिस्टंट सिस्टम (ADAS) तंत्रज्ञानाने सुसज्ज राहणार आहे.

Kia : किया ही देखील लोकप्रिय कार कंपनी आहे. ही कंपनी आपल्या लोकप्रिय कारची फेसलिफ्ट आवृत्ती लाँच करणार आहे. ही गाडी सोनेटची फेसलिफ्ट आवृत्ती लाँच करेल असे बोलले जात आहे. या कारची किमत जानेवारी महिन्यात जाहीर होणार असा अंदाज आहे. हाती आलेल्या माहितीनुसार बाजारात येणाऱ्या या नव्या एसयूव्हीची डिलिव्हरी जानेवारीच्या मध्यात म्हणजेच 15 जानेवारीच्या आसपास सुरू होऊ शकते.

खरेतर Kia Sonet फेसलिफ्टची बुकिंग डिसेंबरच्या सुरुवातीलाचं सुरू झाली होती. यासाठी ग्राहकांना 25,000 रुपये जमा करावे लागत आहेत. Kia Sonet फेसलिफ्टमध्ये डिझेल आणि पेट्रोल पॉवरट्रेनचा समावेश राहणार आहे. बाजारात ही कार Tata Nexon, Maruti Suzuki Brezza आणि Mahindra XUV300 सोबत स्पर्धा करणार आहे. निश्चितच कियाची ही फेसलिफ्ट आवृत्ती कार घेणाऱ्यांसाठी आणखी एक पर्याय उपलब्ध करून देणार आहे.

Ahmednagarlive24 Office