सध्या सणासुदीचा कालावधी सुरू असून काही दिवसांवर दिवाळी सारखा महत्त्वाचा सण येणार आहे व या दिवाळीच्या पार्श्वभूमीवर लक्ष्मीपूजन सारख्या दिवशी वाहन खरेदी मोठ्या प्रमाणावर केली जाते.
यामध्ये बाईक्स तसेच कार, ट्रॅक्टर व इतर वाहनांची खरेदीचे प्रमाण प्रचंड प्रमाणात वाढलेले असते व अनेक वाहन उत्पादक कंपन्यांकडून या कालावधीमध्ये अनेक ऑफर देखील दिल्या जातात. या सणासुदीच्या पार्श्वभूमीवर आता अनेक वाहन उत्पादक कंपन्यांनी नवनवीन कार आणि बाईक्स लॉन्च केल्या असून यामध्ये ग्राहकांना अनेक प्रकारचे पर्याय उपलब्ध झाले आहेत.
बाईक्सच्या दृष्टिकोनातून विचार केला तर या सणासुदीच्या कालावधीमध्ये तुम्हाला परवडणारे किमतीमध्ये चांगली वैशिष्ट्ये असलेली बाईक खरेदी करायची असेल तर तुमच्याकरिता टीव्हीएस मोटरच्या माध्यमातून एक अत्याधुनिक फीचर्स आणि कमीत कमी किमतीतली बाईक लॉन्च करण्यात आलेली आहे.
जी बाईक खरेदी करणाऱ्यांसाठी उत्तम पर्याय ठरेल. नुकतीच टीव्हीएस मोटर्सने आपल्या कम्प्युटर बाईक रेडिओन हे सर्वात स्वस्त असे बेस वेरियंट लॉन्च केले आहे. या स्वस्तातल्या बेस्ट व्हेरिएंटचे नाव Radeon 110 असून ही बाईक ऑल ब्लॅक कलर ऑप्शन्स लॉन्च करण्यात आलेली आहे.
TVS Radeon मध्ये कसे आहे इंजिन?
या बाईकमध्ये 109.7cc एअर कुल्ड, सिंगल सिलेंडर इंजिन दिले असून जे 8.19 पीएस पावर आणि 8.7n टॉर्क जनरेट करते. इंजिन चार स्पीड गिअर बॉक्सने सुसज्ज असून स्मूथ असे इंजिन आहे. जे सिटी राईडसाठी योग्य आहे.
ब्रेकिंग उत्तम राहावी याकरिता बाईकमध्ये ड्रम आणि डिस्क ब्रेकची सुविधा दिली आहे. या बाईकच्या सर्व व्हेरियंटमध्ये 18 इंच अलॉय व्हील देण्यात आलेले आहेत व या बाईकमध्ये कलर एलसीडी स्क्रीन आणि यूएसबी चार्जिंग पोर्टचा समावेश आहे.
बाजारपेठेत टीव्हीएस रेडीओनची थेट स्पर्धा ही स्प्लेंडर प्लसशी असणार आहे. स्प्लेंडर प्लसची किंमत ७४ हजार रुपयांपासून सुरू होते व या बाईकमध्ये 100cc चे इंजिन दिले असून ते 7.9 बीएचपी पावर आणि 8.05 एनएम टॉर्क जनरेट करते व चार स्पीड गिअर बॉक्ससह येते.
किती आहे टीव्हीएस Radeon 110 ची किंमत?
टीव्हीएस Radeon सध्या तीन व्हेरिएंट मध्ये उपलब्ध असून दिल्लीमध्ये त्याच्या बेस एडिशनची एक्स शोरूम किंमत 59880 रुपये आहे तर ड्रम वेरिएंटची किंमत 77 हजार 394 रुपये इतकी आहे. त्यासोबतच Digi डिस्क वेरिएंटची एक्स शोरूम किंमत 81394 रुपये इतकी आहे.