Maruti Suzuki CNG Car:- दिवसेंदिवस आता पेट्रोल आणि डिझेल कारच्या मागणीमध्ये घट होताना दिसून येत असून त्याची जागा आता इलेक्ट्रिक आणि सीएनजी कार्सनी घेतल्याचे दिसून येत आहे. पेट्रोल आणि डिझेलचे वाढते दर पाहता सीएनजी किंवा इलेक्ट्रिक कार नक्कीच परवडणाऱ्या आहेत.
किमतीच्या बाबतीत बघितले तर इलेक्ट्रिक कार या महाग असतात.परंतु त्या दृष्टिकोनातून सीएनजी कार या स्वस्त असल्यामुळे आता सीएनजी कारकडे देखील ग्राहक मोठ्या प्रमाणावर वळताना दिसत आहेत.
भारतीय कार बाजारपेठेमध्ये अनेक कंपन्यांच्या माध्यमातून कमी किमतीत मिळतील अशा व चांगल्यात चांगली वैशिष्ट्ये आणि मायलेजच्या बाबतीत देखील उत्तम असलेल्या कार सध्या बाजारपेठेत आहेत.
सीएनजी कारच्या दृष्टिकोनातून बघितले तर यामध्ये मारुती सुझुकीने देखील स्वस्तात मस्त अशा सीएनजी कार ग्राहकांसाठी उपलब्ध केले आहेत व तुम्हाला देखील जर सीएनजी कार घ्यायची असेल तर या लेखामध्ये आपण मारुतीच्या दोन सीएनजी कारबद्दल थोडक्यात माहिती बघू. जी तुम्हाला सीएनजी कार घ्यायची असेल तर त्याकरिता फायद्याची ठरेल.
या आहेत स्वस्तात मस्त आणि चांगल्या मायलेज देणाऱ्या मारुती सुझुकीच्या सीएनजी कार
1- मारुती सुझुकी सेलेरियो( सीएनजी)- तुम्हाला जर स्वस्तात चांगली सीएनजी कार हवी असेल तर मारुती सुझुकीचे सेलेरियो सीएनजी कार एक बेस्ट ऑप्शन ठरेल. डिझाईनच्या बाबतीत देखील ही कार अव्वल आहेच परंतु इंटरियर स्पेस देखील याचा चांगला असल्याने पाचजण आरामात तिच्यात प्रवास करू शकतात.
मारुती सेलेरियो सीएनजी ही प्रीमियम हॅचबॅक कार असून तिच्या कॉम्पॅक्ट आकारामुळे तुम्ही ट्राफिक मध्ये देखील आरामात मार्ग काढू शकतात. सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून या कारमध्ये लॉक ब्रेकिंग सिस्टीम दिली आहे व त्यासह ईबीडी आणि एअरबॅग देखील देण्यात आलेले आहेत.
मारुती सुझुकी सेलेरिओ सीएनजी मोडवर 34.43 किलोमीटर पर किलो इतके मायलेज देते.मारुती सुझुकीच्या सेलेरियो सीएनजीची एक्स शोरूम किंमत साधारणपणे 6.3 लाख रुपयांपासून सुरू होते.
2- मारुती अल्टो के 10 (सीएनजी)- ही कार पेट्रोल आणि सीएनजी अशा दोन्ही व्हर्जनमध्ये उपलब्ध असून या कारमध्ये 1.0- लिटरचे पेट्रोल इंजिन देण्यात आलेले आहे व यातच सीएनजीचा पर्याय देखील मिळतो. ही एक उत्तम अशी सीएनजी कार असून मायलेज जर बघितले तर सीएनजी मोडमध्ये ही 33.85 किलोमीटर प्रतिकिलो इतके मायलेज देते.
तुम्हाला जर दररोज ट्रॅफिकचा सामना करावा लागत असेल तर मारुतीची ही सीएनजी कार तुमच्यासाठी बेस्ट पर्याय आहे. या कारमध्ये इंटिरियर स्पेस देखील चांगला आहे व हिच्या कॉम्पॅक्ट आकारामुळे ड्रायव्हिंगला देखील खूप सुलभ अशी कार आहे. सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून या कारमध्ये लॉक ब्रेकिंग सिस्टम व त्यासोबत ईबिडी आणि एयर बॅग देखील देण्यात आलेले आहेत.
कुटुंब जर छोटे असेल तर त्यांच्याकरिता ही कार एक चांगला पर्याय आहे. चार जणांच्या प्रवासासाठी मारुती सुझुकी अल्टो के 10 सीएनजी उत्तम कार असून आरामदायी सीट रचना असल्याने तुम्ही लांब अंतराचा प्रवास देखील न थकता करू शकतात.या कारची एक्स शोरूम किंमत पाच लाख 96 हजारापासून सुरू होते.