ट्रॅक्टरमध्ये मिनी ट्रॅक्टर खूप फायद्याचे असून आता अनेक शेतकरी मोठ्या ट्रॅक्टर ऐवजी मिनी ट्रॅक्टर घ्यायला पसंती देतात. त्यातल्या त्यात फळबागातील आंतर मशागतीच्या कामांसाठी मिनी ट्रॅक्टर खूप फायद्याचे असते. त्यामुळे फळबागायतदार मोठ्या प्रमाणावर मिनी ट्रॅक्टर खरेदी करतात.
तसेच ज्यांच्याकडे कमी शेती आहे त्यांना मोठे ट्रॅक्टर घ्यायला परवडत नाही. त्यामुळे छोट्या क्षेत्रासाठी मिनी ट्रॅक्टर खूप फायद्याचे करते व याकरिता अनेक शेतकरी मिनी ट्रॅक्टर खरेदीला प्राधान्य देतात.
अगदी याच पद्धतीने तुम्ही देखील मिनी ट्रॅक्टर घ्यायची प्लॅनिंग करत असाल व कोणते घ्यावे याबाबत गोंधळात असाल तर तुमच्यासाठी आयशर कंपनीचे आयशर 188 4WD अतिशय फायद्याचे ट्रॅक्टर ठरेल. या ट्रॅक्टरच्या मदतीने तुम्ही अवघडातले अवघड शेतीची कामे सहजरित्या करू शकतात. हे ट्रॅक्टर इंधन कार्यक्षम तंत्रज्ञानासह सुसज्ज इंजिनसह येते.
आयशर 188 4WD मिनी ट्रॅक्टरची वैशिष्ट्ये
या आयशर मिनी ट्रॅक्टरमध्ये तुम्हाला ८२५ सीसी क्षमतेसह सिंगल सिलेंडर मध्ये आयशर एअर कुल्ड इंजिन पाहायला मिळते. हे इंजिन 18 एचपी पावर जनरेट करते व या मिनी ट्रॅक्टरची कमाल पीटीओ पावर 15.4 एचपी आहे. त्यामुळे कुठलीही शेतीतील अवजारे सहजपणे या माध्यमातून चालवता येतात.
हे मिनी ट्रॅक्टर 2400 आरपीएम जनरेट करणाऱ्या इंजिनसह येते. तसेच या ट्रॅक्टरमध्ये दर्जेदार असा एअर फिल्टर देण्यात आला असून जो धूळ आणि धुळीपासून इंजिनचा बचाव करतो.
या ट्रॅक्टरमध्ये 28 लिटर क्षमतेची इंधन टाकी देण्यात आली असून कमीत कमी इंधनावर जास्तीचे काम करण्यासाठी हे ट्रॅक्टर सक्षम आहे.हायड्रोलिक क्षमता सातशे किलो असून एकावेळी जास्त वजनाची वाहतूक करता येणे शक्य आहे.
या ट्रॅक्टरचे एकूण वजन ८४० किलो आहे व हा कॉम्पॅक्ट ट्रॅक्टर 2650mm लांब, 970 mm रुंद आणि 1315 एमएम उंच असून 1420 एमएम व्हीलबेससह तयार केला आहे.
आयशर 188 4WD ट्रॅक्टरची इतर महत्त्वाची वैशिष्ट्ये
कंपनीने या ट्रॅक्टरमध्ये मेकॅनिकल स्टेअरिंग दिले असून जे शेतामध्ये आणि खडबडीत रस्त्यांवर आरामदायी ड्रायव्हिंगचा अनुभव देते. या ट्रॅक्टरला आठ फॉरवर्ड+ दोन रिव्हर्स गिअर्ससह गिअरबॉक्स दिला आहे.
हे ट्रॅक्टर सिंगल क्लच आणि साईड शिफ्ट, आंशिक स्थिर जाळी प्रकार ट्रान्समिशनसह येतो. या ट्रॅक्टरचा फॉरवर्ड स्पीड 21.68 किमी प्रतितास असून हे ट्रॅक्टर चार व्हील ड्राईव्ह मध्ये येते.
किती आहे या ट्रॅक्टरची किंमत?
भारतातील आयशर 188 4WD ट्रॅक्टरची एक्स शोरूम किंमत तीन लाख 45 हजार ते तीन लाख 60 हजार रुपये इतकी ठेवण्यात आली आहे. आरटीओ नोंदणी आणि रोड टॅक्स यामुळे या ट्रॅक्टरची ऑन रोड किंमत काही राज्यांमध्ये बदलू शकते. वारंटीचा विचार केला तर कंपनीने या ट्रॅक्टरला दोन हजार तास किंवा दोन वर्षाची वारंटी दिली आहे.