Car Discount Offer : जर या महिन्यात कार घेण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक उत्तम संधी आहे. या महिन्यात अनेक ऑटोमोबाईल कंपन्या आपल्या गाड्यांवर सूट देत आहेत. ही सूट तुम्हाला 1 लाख ते ३ लाख रुपयांपर्यंत मिळत आहे. कोणत्या कंपनी आपल्या कोणत्या गाड्यांवर किती सूट देत आहेत पाहूया..
-प्रथम Hyundai Grand i10 Nios बद्दल बोलूया, कंपनी यावर 43 हजार रुपयांपर्यंत सूट देत आहेत, तसेच 10 हजार रुपयांपर्यंतचे एक्सचेंज, आणि 30 हजार रुपयांपर्यंत रोख आणि 3 हजार रुपयांपर्यंत कॉर्पोरेट सूट ऑफर करत आहे.
-मारुती ग्रँड विटाराच्या 2024 मॉडेलवर कपंनी तुम्हाला 87 हजार रुपयांपर्यंत बचत करण्याची संधी देत आहे, या कारमध्ये 30 हजार रुपयांपर्यंत ग्राहक सूट, 7 हजार रुपयांपर्यंत कॉर्पोरेट सूट आणि एक्सचेंज डिस्काउंट समाविष्ट 50 हजार पर्यंत मिळेल.
-तुम्ही मारुती सुझुकी ग्रँड विटाराच्या 2023 मॉडेलवर 1 लाख 02 हजार रुपयांपर्यंत बचत करू शकता, ज्यामध्ये 45 हजार रुपयांपर्यंत ग्राहक सवलत, 7 हजार रुपयांपर्यंत कॉर्पोरेट सूट आणि 50 रुपयांपर्यंत एक्सचेंज सूट मिळत आहे.
-होंडा सिटीच्या 5व्या पिढीच्या मॉडेलवर कपंनी 30 हजार रुपयांपर्यंत रोख सवलत, 6 हजार रुपयांपर्यंत एक्सचेंज डिस्काउंट, 8 हजार रुपयांपर्यंत कॉर्पोरेट सूट आणि 4 हजार रुपयांपर्यंतचा लॉयल्टी बोनस देत आहे.
-Tata Motors ची लोकप्रिय कार Tata Nexon EV MAX वर 3 लाख 15 हजार रुपयांपर्यंत बचत करण्याची उत्तम संधी आहे, ज्यामध्ये 50 हजार रुपयांपर्यंतचे एक्सचेंज डिस्काउंट आणि 2.65 लाख रुपयांपर्यंत रोख सवलत आहे.
-जर तुम्हाला नवीन SUV घ्यायची असेल, तर मार्चमध्ये Volkswagen Tiguan वर 3.40 लाख रुपयांपर्यंत बचत करण्याची चांगली संधी आहे, या वाहनामध्ये 75 हजार रुपयांपर्यंतचे एक्सचेंज, 75 हजार रुपयांपर्यंत रोख, कॉर्पोरेट सूट लाख आणि SVP ला 90 हजार रुपयांपर्यंत लाभ मिळणार आहे.