Tata Punch Electric Price : इलेक्ट्रिक कार घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. ती म्हणजे देशातील सर्वात मोठी प्रवासी वाहन निर्माती कंपनी टाटाने मोठा धमाका केला आहे.
टाटाने टाटा पंच इलेक्ट्रिक लाँच केली आहे. खरेतर या गाडीसाठी आधीच अधिकृत बुकिंग सुरू झाली होती. या गाडीची फक्त 21,000 रुपये टोकन अमाऊंट देऊन बुकिंग सुरू झाली आहे. दरम्यान आज ही गाडी अधिकृत रित्या विक्रीसाठी लॉन्च करण्यात आली आहे.
विशेष म्हणजें देशातील अनेक डीलर्सकडे ही गाडी पोहोचू देखील लागली आहे. आज पासून या गाडीची टेस्ट ड्राईव्ह सुरू होणार आहे. मात्र या गाडीची डिलिव्हरी ही 22 जानेवारीपासून सुरू होणार आहे.
या महिन्याच्या अखेरपर्यंत या गाडीची डिलिव्हरी देशातील जवळपास सर्वच शहरांमध्ये सुरू होणार आहे. अशा परिस्थितीत आता आपण टाटा इलेक्ट्रिक पंचची किंमत किती राहणार आणि या गाडीचे फीचर्स काय राहणार याविषयी थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
किती वॅरीयंटमध्ये उपलब्ध होणार टाटा पंच इलेक्ट्रिक
कंपनीने लाँचिंगवेळी दिलेल्या माहितीनुसार, ही गाडी पाच वॅरीयंटमध्ये उपलब्ध होणार आहे. स्मार्ट, स्मार्ट प्लस, एडवेंचर एम्पावर्ड आणि एम्पावर्ड प्लस अशा पाच व्हेरिएंट मध्ये ही गाडी उपलब्ध होणार आहे. दोन वेगवेगळ्या बॅटरी पॅक आणि दोन वेगवेगळ्या ड्रायव्हिंग पॉवरट्रेनसह येणारी ही इलेक्ट्रिक एसयूव्ही देशातील सर्वात सुरक्षित ईव्ही कार असल्याचा कंपनीचा दावा आहे.
टाटाची ही नवीन इलेक्ट्रिक कार नवीन आर्किटेक्चर म्हणजे Acti.ev वर चालणारी कंपनीची पहिलीवहिली गाडी राहणार आहे. यात एकाधिक बॅटरी पॅक आणि ड्रायव्हिंग रेंजची सुविधा असेल. पंच EV बद्दल बोलायचे झाल्यास, ही SUV लाँग रेंज आणि स्टँडर्ड रेंज व्हेरियंटमध्ये ऑफर केली जात आहे.
यामध्ये लाँग रेंज व्हेरियंटमध्ये 3 ट्रिम्स आणि स्टँडर्ड रेंज व्हेरियंटमध्ये 5 ट्रिम्स समाविष्ट राहणार आहेत. कंपनी या एसयूव्हीसोबत ३.३ किलोवॅट क्षमतेचा वॉलबॉक्स चार्जर देत आहे. ही एसयूव्ही सनरूफ आणि विदाउट सनरूफ अशा दोन्ही पर्यायांसह येणार आहे.
या नव्याने लॉन्च झालेल्या कार कंपनीने दोन वेगवेगळ्या बॅटरी पॅकसह सादर केली आहे. यातील 25kWh बॅटरी पॅकची कार एका चार्जमध्ये 315 किलोमीटरपर्यंतची रेंज देते, तर 35kWh क्षमतेची बॅटरी पॅक एका चार्जमध्ये 421 किलोमीटर पर्यंतची रेंज देणार असा दावा कंपनीने केला आहे.
किंमत किती राहणार
आकर्षक लुक आणि शक्तिशाली बॅटरी पॅकसह सुसज्ज, टाटा पंच EV ची सुरुवातीची किंमत 10.99 लाख रुपये आहे, जी टॉप व्हेरियंटसाठी 14.99 लाख रुपये (एक्स-शोरूम) पर्यंत जाते. कंपनीकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार, स्मार्ट वॅरिएंटची किंमत 10.99 लाख रुपये ठेवण्यात आली आहे.
स्मार्ट प्लस गाडीची 11.49 लाख रुपये एवढी किंमत ठेवण्यात आली आहे. एडवेंचर वॅरियन्ट दोन बॅटरी पॅक मध्ये येत असून यात 35kWh बॅटरी पॅक वॅरिएंटची किंमत 12.99 लाख आणि 25kWh बॅटरी पॅक वॅरिएंटची किंमत 11.99 लाख रुपये एवढी आहे. एम्पावर्ड वेरिएंट देखील दोन बॅटरी पॅक मध्ये येते,
यात अधिक रेंजच्या बॅटरी पॅक मॉडेलची किंमत 13.99 लाख एवढी ठेवली आहे आणि कमी रेंजच्या बॅटरी पॅक मॉडेल ची किंमत 12.79 लाख एवढी ठेवण्यात आली आहे. एमपावर प्लस हे वेरियंट देखील दोन बॅटरी बॅक मध्ये लाँच झाले आहे,
यात लॉन्ग रेंज बॅटरी पॅक व्हेरिएंट ची किंमत 14.49 लाख आणि कमी रेंज च्या बॅटरी पॅक व्हेरिएंट ची किंमत 13.29 लाख एवढी ठेवण्यात आली आहे. या सर्व किमती एक्स शोरूम राहणार आहेत याची नोंद मात्र घ्यायची आहे.