ऑटोमोबाईल

लवकरच लॉन्च होणार देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार ! किंमत राहणार फक्त 4 लाख, फिचर्स कसे असणार ? वाचा….

Published by
Tejas B Shelar

Indias Cheapest Electric Car : गेल्या काही वर्षांमध्ये भारतात इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढला आहे. अनेक ऑटो कंपन्यांनी आता नवनवीन इलेक्ट्रिक कार बाजारात लॉन्च केल्या आहेत. येत्या काळात आणखी नवीन इलेक्ट्रिक कार भारतीय कार बाजारात दाखल होणार आहेत. दरम्यान स्वस्त आणि अधिक ड्रायव्हिंग रेंज देणारी स्वस्त इलेक्ट्रिक कार खरेदी करू इच्छिणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे.

ती म्हणजे नजीकच्या भविष्यात भारतीय कार बाजारात देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार लॉन्च होणार आहे. यामुळे मध्यमवर्गीयांना देखील स्वस्तात इलेक्ट्रिक कार खरेदी करता येणार आहे.

मध्यमवर्गीय लोकांना केंद्रस्थानी ठेवून देशाची आर्थिक राजधानी आणि महाराष्ट्र राज्याची राज्य राजधानी मुंबईस्थित स्टार्टअप पर्सनल मोबिलिटी व्हेईकलने (PMV इलेक्ट्रिक) देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार तयार केली आहे.

या इलेक्ट्रिक कारला कंपनीने PMV EaS-E असे नाव दिले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही एक इलेक्ट्रिक मायक्रो कार राहणार आहे. याची किंमत सध्या भारतीय कार बाजारात उपलब्ध असणाऱ्या इलेक्ट्रिक कार पेक्षा खूपच कमी राहणार आहे.

पीएमव्हीची किंमत ही सुमारे 4 ते 5 लाख रुपये एवढी राहणार असा दावा केला जात आहे. या ई-कारची लांबी मात्र 2,915 मिमी एवढी आहे. महत्त्वाचे म्हणजे ही कार फक्त 2000 रुपयांच्या टोकन रकमेसह बुक करता येणार आहे.

म्हणजे तुम्ही फक्त दोन हजार रुपये देऊन ही कार बुक करू शकणार आहात. दरम्यान आता आपण या कारचे फीचर्स कसे राहणार याबाबत थोडक्यात माहिती पाहणार आहोत.

कसे असतील फिचर्स

ही कार देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार असेल. या कारची रेंज देखील खूपच चांगली राहणार आहे. एका चार्जमध्ये ही कार 160Km ची ड्रायव्हिंग रेंज ऑफर करणार असा दावा कंपनीने केला आहे. ही इलेक्ट्रिक कार 15 amp सॉकेटमधून चार्ज केली जाऊ शकते.

ही गाडी चार तासात फुल चार्ज होणार आहे. ही अपकमिंग कार Tata Tiago EV आणि MG Comet EV पेक्षाही स्वस्त राहणार आहे. कंपनीने ही गाडी 2022 मध्ये सादर केली होती. मात्र अजूनही गाडी ऑफिशियली लाँच झालेली नाही.

यामुळे ही गाडी कधीपर्यंत भारतीय कार बाजारात लॉन्च होणार हा सवाल कायम आहे. ही मायक्रो सेगमेंटमधील साईड कार राहणार आहे. ही गाडी आकाराने छोटी असल्याने कुठेही पार्क करता येऊ शकते. ट्रॅफिक मध्ये ड्रायव्हिंग साठी EaS-E हा मोड दिला जाणार आहे.

या गाडीमध्ये ड्रायव्हर सेन्सिटिव्ह ऑटोमॅटिक अनलॉक सिस्टम राहणार आहे. या गाडीमध्ये गेअर आणि क्लच राहणार नाही. इलेक्ट्रिक असल्याने पेट्रोल पंप वर थांबण्याची गरज नाही. पुढे आणि मागे दोन सिंगल सीट राहणार आहेत. या गाडीला दोन दरवाजे असतील.

Tejas B Shelar

Based in Ahmednagar, Maharashtra, I Am a Founder Editor for Ahmednagarlive24, Covering Politics, Technology, Automobile, Finance, Investment and Share Market Related News. For News Tips, You Can Reach Me at edit.tejasbshelar@gmail.com