India’s Safest SUV Car List 2024 : अलीकडे भारतात रस्ते अपघातांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. विशेष म्हणजे रस्ते अपघातांची संख्या डे बाय डे वाढतच आहे. रस्ते अपघातांमध्ये मोठ्या प्रमाणात जीवितहानी देखील होत आहे. यामुळे अलीकडे अनेकजण सुरक्षित कार खरेदी करण्याला विशेष महत्त्व दाखवत आहेत. जेणेकरून अपघात झाल्यानंतरही कारमधील प्रवासी सुरक्षित राहतील.
अशा परिस्थितीत अनेकांच्या माध्यमातून टाटा कंपनीच्या सर्वात सुरक्षित आणि स्टायलिश SUV कोणत्या आहेत असा प्रश्न उपस्थित केला जात होता. दरम्यान आज आपण टाटा कंपनीच्या सर्वाधिक सुरक्षित आणि स्टायलिश एसयूव्ही कारची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. आज आपण भारतातील टॉप तीन सर्वाधिक सुरक्षित आणि स्टायलिश SUV गाड्यांची माहिती पाहणार आहोत.
टाटा सफारी : Tata ही भारतातील लोकप्रिय ऑटो कंपनी आहे. या कंपनीच्या अनेक गाड्या ग्राहकांमध्ये लोकप्रिय आहेत. कंपनीने अनेक सेफ्टी कार लॉन्च केल्या आहेत. Safari ही देखील कंपनीची सर्वाधिक सुरक्षित कार म्हणून ओळखली जाते. या गाडीला ग्लोबल NCAP ने कौटुंबिक सुरक्षिततेसाठी क्रॅश टेस्टमध्ये 5-स्टार रेटिंग दिले आहे. टाटा सफारीला प्रौढांच्या सुरक्षेसाठी 34 पैकी 33.05 गुण मिळाले आहेत. तर मुलांच्या सुरक्षेसाठी या एसयूव्हीला ४९ पैकी ४५ गुण मिळाले आहेत. कंपनी टाटा सफारीमध्ये सुरक्षेसाठी 6-एअरबॅग ऑफर करत आहे. त्यामुळे जर तुम्हाला तुमच्या परिवारासाठी सुरक्षित एसयुव्ही खरेदी करायची असेल तर टाटा कंपनीची ही गाडी तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन ठरणार आहे.
टाटा हॅरियर : टाटा कंपनीची ही आणखी एक सुरक्षित कार आहे. ही SUV कंपनीची एक लोकप्रिय कार आहे. या Harrier कारला भारत NCAP सोबत ग्लोबल NCAP ने सुरक्षिततेसाठी 5-स्टार रेटिंग दिले गेले आहे. टाटा हॅरियरलाही प्रौढांच्या सुरक्षिततेसाठी आणि मुलांच्या सुरक्षिततेसाठी टाटा सफारीसारखेच गुण मिळाले आहेत. यामुळे जर तुम्हाला सेफ्टी SUV खरेदी करायची असेल तर टाटा कंपनीची ही गाडी देखील एक बेस्ट ऑप्शन राहणार आहे.
टाटा नेक्सॉन : Tata Nexon ही कंपनीची आणखी एक लोकप्रिय गाडी. या गाडीची लोकप्रियतेबाबत बोलायचं झालं तर ही गाडी गेल्या वर्षी भारतातील सर्वाधिक विकली जाणारी SUV बनली होती. विशेष म्हणजे या गाडीला ग्लोबल NCAP द्वारे कौटुंबिक सुरक्षेसाठी क्रॅश चाचणीमध्ये 5-स्टार रेटिंग देखील देण्यात आले आहे. म्हणजेच ही देखील एक सेफ्टी कार आहे. Tata Nexon ला 6 एअरबॅग देण्यात आले आहेत.