आयफोन खरेदी करणाऱ्यांसाठी गुड न्यूज ! iPhone 14 वर मिळतोय तब्बल 17 हजाराचा डिस्काउंट, कुठं सुरूय ऑफर?

Tejas B Shelar
Published:
iPhone 14 Discount Offer

iPhone 14 Discount Offer : तुम्हालाही आयफोन खरेदी करायचा आहे का? मग आजची ही बातमी तुमच्यासाठी कामाची ठरणार आहे. विशेषता ज्यांना आयफोन 14 घ्यायचा असेल त्यांच्यासाठी ही बातमी खास ठरणार आहे. एप्पल कंपनीच्या आयफोन 14 वर अमेझॉन या लोकप्रिय शॉपिंग साइटवर मोठा डिस्काउंट ऑफर सुरू आहे.

खरे तर एप्पल कंपनीचा हा आयफोन ग्राहकांमध्ये खूपच लोकप्रिय बनला आहे. याची बाजारात मोठी डिमांड आहे. तरुणांमध्ये आयफोन 14 या हँडसेट ची मोठी क्रेझ असून जर तुम्हालाही हा आयफोन खरेदी करायची असेल तर तुमच्यासाठी अमेझॉन वर एक विशेष ऑफर सुरू आहे.

यामुळे तुम्हाला हा हँडसेट खूपच कमी किमतीत खरेदी करता येणार आहे. हा हँडसेट अमेझॉन वर तब्बल 17 हजार रुपयांनी स्वस्त मिळणार आहे. विशेष म्हणजे या डीलचा फायदा घेण्यासाठी तुम्हाला कोणत्याही बँकेच्या क्रेडिट कार्डची गरज नाही.

Amazon वर 17,100 रुपयांची थेट सूट उपलब्ध आहे. आणखी सवलत मिळवण्यासाठी तुम्ही एक्सचेंज ऑफरचा आणि विविध बँकेच्या ऑफरचा देखील लाभ घेऊ शकता.

iPhone 14 ची मूळ किंमत किती?

iPhone 14 च्या 128 GB व्हेरिएंटची मूळ किंमत ही 79 हजार 900 रुपये एवढी आहे. जवळपास 80 हजार रुपयांच्या या हँडसेटवर मात्र अमेझॉन वर मोठा डिस्काउंट दिला जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार Amazon या ऑनलाइन शॉपिंग साइटवर हा हँडसेट 62,800 रुपयांना लिस्ट करण्यात आला आहे. म्हणजेच कंपनी यावर 21 टक्के सूट देत आहे. यानुसार, ग्राहकांना 17,100 रुपये वाचवण्याची संधी उपलब्ध झाली ​​आहे.

iPhone 14 वर सुरू असणाऱ्या इतर ऑफर्स

Amazon या शॉपिंग साइटवर iPhone 14 साठी एक्सचेंज ऑफर देखील सुरु आहे. या ऑफर अंतर्गत ग्राहकांना 44,250 रुपयांपर्यंतच्या डिस्काउंट मिळू शकतो.

पण, एक्सचेंज ऑफरची किंमत आपण एक्सचेंज करत असलेल्या स्मार्टफोनच्या मॉडेल आणि स्थितीवर अवलंबून राहणार आहे. याशिवाय, SBI आणि ICICI क्रेडिट कार्ड वापरकर्त्यांना पेमेंट केल्यावर डिव्हाइसवर 3,000 रुपयांपर्यंत सूट मिळू शकते.

जर ग्राहकांनी Amazon Pay ICICI बँक कार्डवरून नॉन-ईएमआय पर्यायासह हा फोन खरेदी केला तर त्यांना 41,940 च्या खरेदीवर 2,000 ची सूट मिळणार आहे. तसेच, ग्राहकांना Amazon Pay ICICI बँक कार्डद्वारे किमान 41,940 रुपयांच्या खरेदीसह EMI व्यवहारांवर रु. 3,000 ची झटपट सूट मिळू शकते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe