Honda SP 160 VS Honda Unicorn:- भारतीय बाईक बाजारपेठेमध्ये अनेक वेगवेगळ्या कंपन्यांच्या बाईक असून अगदी सर्वसामान्यांना परवडतील अशा किमतीन पासून तर काही लाखो रुपये किंमतीच्या बाईक देखील आपल्याला उपलब्ध असल्याचे दिसून येते.
त्यामुळे ग्राहकांना स्वतःचा आर्थिक बजेट आणि त्या बजेटमध्ये कशी बाईक हवी आहे? याबाबत अनेक पर्याय उपलब्ध असल्याचे आपल्याला दिसते.यामध्ये जर आपण बघितले तर ग्राहकांमध्ये होंडा कंपनीच्या बाईक विशेष लोकप्रिय असल्याचे दिसून येते.
या कंपनीच्या माध्यमातून भारतीय बाईक बाजारपेठेत आतापर्यंत अनेक वेगवेगळी वैशिष्ट्ये असलेल्या आणि वेगवेगळ्या किमती मधील बाईक लॉन्च करण्यात आलेले आहेत व आतापर्यंत होंडा कंपनीच्या बाईक देखील विशेष लोकप्रिय झालेले आहेत.
त्यामुळे तुम्हाला देखील बाईक खरेदी करायची असेल आणि तीही होंडाची तर या लेखामध्ये आपण होंडांची एसपी 160 आणि युनिकॉर्न या दोन महत्त्वाच्या आणि लोकप्रिय असलेल्या बाईकची तुलनात्मक दृष्ट्या माहिती बघणार आहोत. त्यामुळे या दोन्ही बाइक मधील फरक समजणे सोपे होईल.
डिझाईन आणि इतर वैशिष्ट्यांच्या बाबतीत असलेला फरक
होंडा एसपी 160 आणि युनिकॉन या दोन्ही बाईक आता अपडेट करण्यात आलेले आहेत. म्हणजेच यामध्ये आता पूर्वीच्या तुलनेत काही बदल करण्यात आलेले आहेत. या बदलाच्या दृष्टिकोनातून जर बघितले तर होंडा एसपी 160 ने त्याच्या डिझाईनमध्ये अपडेट केले असून त्यामुळे ही बाईक अगोदर पेक्षा अधिक स्पोर्टी दिसते.
या बाईकला एलईडी लाइटिंग आणि नवीन टेल लॅम्प देण्यात आला आहे व ती पाच रंगांच्या पर्यायांमध्ये सध्या उपलब्ध आहे. परंतु होंडा यूनिकॉर्न 160 ला मात्र डिझाईन अपडेट मिळत नाही आणि तीन रंग पर्यायांमध्ये ती सध्या उपलब्ध आहे.
फीचर्स बघितली तर होंडा एसपी 160 ला फोन कनेक्टिव्हिटी आणि नेवीगेशन सोबत नवीन टीएफटी इन्स्ट्रुमेंट कन्सोल मिळतो. तर त्या तुलनेत होंडा यूनिकॉर्नला गिअर पोझिशन इंडिकेटरसह डिजिटल इन्स्ट्रुमेंट कन्सोल मिळतो. तसेच या दोन्ही मोटरसायकलींमध्ये टाईप सी चार्जिंग पोर्ट आणि एलईडी लाइट्स देण्यात आले आहेत.
दोन्ही बाइकमधील इंजिनची तुलना
कंपनीने दोन्ही मोटरसायकल पाच स्पीड गिअर बॉक्सशी कनेक्ट केले असून दोन्हीही बाईक एअर कुल्ड सिंगल सिलेंडर इंजिन द्वारे समर्थित आहेत. म्हणजेच दोन्ही बाइक मध्ये एक सारख्या प्रकारची इंजिन आणि पावर आउटपुट आहे. परंतु टॉर्कच्या बाबतीत मात्र थोडासा फरक यामध्ये आपल्याला दिसून येतो.
तसेच सध्या OBD2B नियमांची पूर्तता करण्यासाठी दोन्ही बाइकचे इंजिन अपडेट केले आहेत. ग्राहकांच्या गरजा लक्षात घेऊन दोन्ही बाइकमध्ये हवे ते बदल करण्यात आले आहेत.या दोन्ही बाइकमध्ये 162.7 डिस्प्लेसमेंट देण्यात आले असून जे 13 बीएचपी पावर आणि 14.8 एनएमचा टॉर्क जनरेट करते.