Ahmednagarlive24 Marathi News
Marathi Breaking News, Marathi Live Batmya, मराठी बातम्या

Jeep Car Price : काय सांगता ! ‘ह्या’ 2 नवीन SUV बाजारात देणार थेट Fortuner ला टक्कर ; खरेदीसाठी मोजा फक्त ‘इतके’ पैसे

तुमच्या माहितीसाठी जाणून घ्या या दोन्ही कारची किंमत 33.41 लाख रुपयांपासून सुरू होते आणि 38.47 लाख रुपयांपर्यंत जाते. या दोन्ही कारचे बुकिंगही कंपनीने सुरू केले आहे.चला मग जाणून घेऊया या दोन्ही कारबद्दल संपूर्ण माहिती.

Jeep Car Price :   भारतीय बाजारात आज सर्वात लोकप्रिय असणारी एसयूव्ही म्हणजे Fortuner होय. आम्ही तुम्हाला सांगतो बाजारात आज Fortuner ला दमदार फीचर्स आणि उत्तम मायलेजमुळे तसेच जबरदस्त लूकमुळे मोठ्या प्रमाणात मागणी आहे.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

मात्र आता आम्ही तुम्हाला सांगतो बाजारात Fortuner ला टक्कर देण्यासाठी जीप इंडियाने Meridian X आणि Upland Special Edition लाँच केले आहे.  तुमच्या माहितीसाठी जाणून घ्या या दोन्ही कारची किंमत 33.41 लाख रुपयांपासून सुरू होते आणि 38.47 लाख रुपयांपर्यंत जाते. या दोन्ही कारचे बुकिंगही कंपनीने सुरू केले आहे.चला मग जाणून घेऊया या दोन्ही कारबद्दल संपूर्ण माहिती.

हे जाणून घ्या कि बाजारात Meridian Special Edition मर्यादित राहणार असून कारची फक्त काही युनिट्स बनवली जाणार आहे. या कारची खासियत अशी आहे की तुम्ही तुमच्या स्वत:च्या फीचर्स आणि अपहोल्स्ट्रीनुसार ती अपग्रेड करू शकता आणि कारचे इंटीरियर डिझाईन देखील मिळवू शकता. तथापि रंग पर्याय म्हणून आपल्याला फक्त सिल्व्हर मून आणि गॅलेक्सी ब्लू मिळेल.

शहरी ग्राहकांवर लक्ष

कंपनीच्या म्हणण्यानुसार, शहरी ग्राहकांना लक्षात घेऊन मेरिडियन एक्सची डिजाइन करण्यात आली आहे. मेरिडियनची बॉडीचा रंगही खूप वेगळा आहे. कारमध्ये स्टॅन्डर फिटमेंट म्हणून सनरूफ आणि अलॉय व्हील उपलब्ध असतील. कारच्या एक्सटीरियरबद्दल बोलायचे झाले तर साइड मोल्डिंग्स वेगळ्या डिझाइनमध्ये दिसतील. यासोबतच पुडल लॅम्प्स, एंट्री अॅम्बियंट लाइटिंग आणि कीलेस अँटी यांसारखी अनेक फीचर्स मिळणार आहे.

मिळणार खास डिजाइन

अपलँड स्पेशल एडिशनमध्ये रूफ कॅरियर, साइड स्टेप्स, स्प्लॅश गार्ड्स, बूट ऑर्गनायझर, सनशेड्स, कार्गो मॅट्स, टायर इन्फ्लेटर आणि खास डिझाईन केलेले हूड डेकल देखील मिळते. हे व्हर्जन वायफायला सपोर्ट करते आणि त्याची 11.6-इंचाची इन्फोटेनमेंट सिस्टीम रियर एंटरटेनमेंट सिस्टमही सपोर्ट करते.

पावर आणि परफॉर्मेंस

दोन्ही SUV मध्ये 2.0-लिटर डिझेल इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन 6 स्पीड मॅन्युअल आणि 9 स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशनच्या पर्यायात आहे. जीपचा दावा आहे की दोन्ही कारचा टॉप स्पीड 198 किमी  प्रती तास आहे आणि ते 10.8 सेकंदात 100 किमी प्रति तास वेग पकडतो . ही कार लिमिटेड (O) व्हेरियंटमध्ये खरेदी केले जाऊ शकतात.

हे पण वाचा :-  Solar Rooftop Subsidy Yojana 2023: 25 वर्षे मिळणार विजेच्या खर्चातून सुटका ! फक्त करा ‘हे’ काम होणार मोठी बचत