Jeep Cars Discounts : नवीन कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी चांगली संधी आहे. कारण Jeep कार उत्पादक कंपनीकडून त्यांच्या शानदार 2 कारवर लाखो रुपयांची सूट दिली जात आहे. तुम्ही देखील या कार खरेदी करून लाखोंची बचत करू शकता.
जीप इंडिया कार कंपनीकडून त्यांच्या मेरिडियन आणि कंपास या दोन एसयूव्ही कारवर मोठी सूट दिली जात आहे. जीप कंपनीकडून अलीकडेच एक नवीन जीप एक्सपर्ट सेवा सुरु करण्यात आली आहे. यामध्ये चॅटबॉट आहे जो ChatGPT वापरतो.
जीप मेरिडियन
जीप कार उत्पादक कंपनीकडून त्यांच्या मेरिडियन लक्झरी एसयूव्ही कारवर तब्बल 2.75 लाख रुपयांपर्यंतची सूट दिली जात आहे. या कारच्या बेस मॉडेलची एक्स शोरूम किंमत 33.60 लाख रुपये आहे तर टॉप मॉडेलची एक्स शोरूम किंमत 39.66 लाख रुपये आहे. ही कार सात व्हेरियंटमध्ये सादर करण्यात आली आहे.
जीप मेरिडियन वैशिष्ट्ये
जीप मेरिडियन एसयूव्ही कारमध्ये लक्झरी फीचर्स देण्यात आले आहेत. कारमध्ये प्रवाशांच्या सुरक्षेसाठी ADAS फीचर्स दिले आहे. कारमध्ये 10.1 इंचाची इन्फोटेनमेंट स्क्रीन, ड्रायव्हर डिजिटल डिस्प्ले, एसी सीट, वायरलेस फोन चार्जिंग, ऍपल कार प्ले आणि अँड्रॉइड ऑटो कनेक्टिव्हिटी, मल्टी झोन क्लायमेट कंट्रोल एसी कुलिंग, पॅनोरॅमिक सनरूफ, 360 डिग्री कॅमेरा आणि 6 एअरबॅग्ज असे फीचर्स देण्यात आले आहेत.
Jeep कंपास SUV
जीप कार कंपनीच्या कंपास एसयूव्ही कारवर देखील 1.2 लाख रुपयांची मोठी सूट देण्यात येत आहे. कारच्या बेस मॉडेलची एक्स शोरूम किंमत 20.49 लाख रुपये आहे तर टॉप मॉडेलची एक्स शोरूम किंमत 32.07 लाख रुपये ठेवण्यात आली आहे.
Jeep कंपास SUV वैशिष्ट्ये
कारमध्ये ADAS फीचर्स देण्यात आले आहे. यामध्ये ड्रायव्हर स्लीप डिटेक्टर, सक्रिय ब्रेकिंगसह फुल-स्पीड फॉरवर्ड टक्कर अलर्ट, पादचारी/सायकलस्वार स्वयंचलित आपत्कालीन ब्रेकिंग, सक्रिय लेन व्यवस्थापन आणि मागील क्रॉस पाथ डिटेक्टर यांचा समावेश आहे.
जीप कंपास एसयूव्ही कारमध्ये 10.25-इंच फ्रेमलेस पूर्ण-रंग TFT डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, मानक 10.1-इंच डिजिटल इन्फोटेनमेंट टचस्क्रीन, Android Auto सह मानक वायरलेस Apple CarPlay आणि U Connect 5 आणि वायरलेस चार्जिंग पॅड असे अनेक मानक फीचर्स दिले गेले आहेत.