Maruti Eeco CNG Car EMI Calculation:- स्वतःची कार असणे किंवा स्वतःच्या घरासमोर चारचाकी उभी असणे हे आपल्यापैकी बऱ्याच जणांचे स्वप्न असते हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी बरेचजण प्रयत्न देखील करत असतात व आर्थिक जुळवा जुळव करत असतात.
परंतु बऱ्याचदा जीवनाच्या रहाटगाडग्यामध्ये आर्थिक बजेट काही केल्या बसत नाही व कार घेण्याचे स्वप्न हे स्वप्नच राहते. परंतु आता अनेक बँकांच्या माध्यमातून कारलोन दिले जात असल्याने अनेक जण कारलोन घेऊन कार खरेदीचे स्वप्न पूर्ण करतात.
तसेच कार खरेदी करताना बरेचजण ज्याप्रमाणे आर्थिक बजेटचा प्रामुख्याने विचार करतात. अगदी त्याच पद्धतीने कुटुंबातील सदस्य संख्या या संकल्पनेचा देखील विचार केला जातो. कुटुंबाच्या दृष्टिकोनातून जर बघितले तर कुटुंब मोठे असेल तर सात सीटर कार घ्यायला प्राधान्य दिले जाते.
भारतीय कार बाजारपेठेमध्ये अनेक कंपन्यांच्या माध्यमातून उत्कृष्ट फीचर्स असलेल्या सात सिटर कार लॉन्च करण्यात आलेले आहेत. त्यातीलच एक कार आपण बघितली तर मारुती सुझुकीची इको ही देशातील महत्वाची अशी सात सीटर कार आहे. भारतामध्ये मोठ्या संख्येने ही कार खरेदी केली जाते.
यामध्ये सीएनजी प्रकार देखील असून तुम्हाला जर मारुती इकोचा सीएनजी प्रकार घ्यायचा असेल तर तुम्ही खरेदी करू शकतात.याकरिता तुम्ही जर एक लाख रुपये डाऊनपेमेंट केले तर तुम्हाला किती लोन मिळेल व किती ईएमआय प्रतिमहिना तुम्हाला भरावा लागेल? याबाबतची माहिती थोडक्यात बघू.
मारुती इको सीएनजीची किंमत किती आहे?
मारुती इकोचा सीएनजी प्रकाराची जर किंमत बघितली तर ती सहा लाख 58 हजार रुपये एक्स शोरूम इतकी आहे. या किमतीशिवाय 46 हजार 890 रुपयांचा आरटीओ आणि 48 हजार 359 रुपयांचा विमा व त्यासोबतच 5485 रुपयांचा फास्टटॅग आणि स्मार्ट कार्डसह काही अत्यावश्यक ॲक्सेसरीजचा समावेश होतो.
एक लाख डाऊन पेमेंट केले तर किती भरावा लागेल ईएमआय?
तुम्ही जर मारुती इको सीएनजी प्रकार खरेदी करायचे ठरवले तर बँकेकडून एक्स शोरूम किमतीवर तुम्हाला कर्ज पुरवठा केला जातो. समजा तुम्ही एक लाख रुपयांचे डाऊन पेमेंट केले तर तुम्हाला सहा लाख 58 हजार रुपयांची रक्कम बँकेकडून फायनान्स करावी लागेल.
जर बँकेने 8.7% व्याजदराने तुम्हाला सहा वर्षांसाठी सहा लाख 58 हजार रुपयांचे कर्ज दिले तर तुम्हाला पुढील सात वर्षांकरिता प्रत्येक महिन्याला 11 हजार 763 रुपयांचा ईएमआय भरावा लागेल.
अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला इको सीएनजी करिता सहा वर्षात व्याजापोटी बँकेला एक लाख 89 हजार रुपये द्यावे लागतील. अशाप्रकारे या कारची एक्स शोरूम, ऑन रोड आणि व्याजासह एकूण किमती करिता तुम्हाला नऊ लाख 47 हजार रुपये बँकेला द्यावे लागतील.